Newspaper and Magazine Subscriptions : उपमुख्यमंत्र्यांसह, सर्व मंत्र्यांना मिळणारी वृत्तपत्रे, नियतकालिके बंद

 सामान्य प्रशासन विभागाचा निर्णय; संबंधित मंत्र्यांच्या विभागांनी खर्च उचलण्याची सूचना


मुंबई : उपमुख्यमंत्री, विविध खात्यांचे मंत्री आणि राज्यमंत्री यांच्या मंत्रालयातील कार्यालयांसह निवासस्थानी वृत्तपत्रे व नियतकालिके पुरवण्याची गेल्या अनेक वर्षांपासून चालत आलेली मध्यवर्ती कार्यपद्धती राज्य शासनाने रद्द केली आहे. येत्या १ सप्टेंबरपासून या सर्व वृत्तपत्रांचा पुरवठा सामान्य प्रशासन विभागामार्फत (जीएडी) बंद करण्यात येणार असून, ही खरेदी व त्याची बिले मंजूर करण्याची जबाबदारी आता संबंधित मंत्र्यांच्या प्रशासकीय विभागांकडे सोपवण्यात आली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय गुरुवारी जारी करण्यात आला.



नवीन निर्णयानुसार, यापुढे प्रत्यक्ष कागदी वृत्तपत्रांपेक्षा डिजिटल वाचनाला प्राधान्य देत ऑनलाईन सदस्यता (डिजिटल सबस्क्रिप्शन) घेण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. मुख्यमंत्री कार्यालयासाठी मात्र वृत्तपत्र वितरणाची सध्याची पद्धत पूर्ववत सुरू राहील आणि त्यांचा खर्चही नेहमीप्रमाणे सामान्य प्रशासन विभागामार्फतच केला जाईल. (Newspaper and Magazine)



उपमुख्यमंत्री, मंत्री व राज्यमंत्र्यांच्या कार्यालयांनी आणि निवासस्थानी वृत्तपत्रे उपलब्ध करून घेण्यासाठी ऑनलाईन सदस्यत्वाला प्राधान्य द्यायचे असून, या वृत्तपत्रांची बिले संबंधित मंत्री कार्यालयाकडून त्यांच्या प्रशासकीय विभागाकडे मंजुरीसाठी पाठवली जातील. हा खर्च संबंधित विभागांनी त्यांच्या 'कार्यालयीन खर्च' या लेखाशीर्षाखाली उपलब्ध असलेल्या निधीतून भागवायचा आहे.यापूर्वी १९८६ च्या वित्तीय आदेशानुसार, सामान्य प्रशासन विभाग सर्व मंत्र्यांच्या कार्यालयांसाठी वृत्तपत्रांची मध्यवर्ती खरेदी करून विक्रेत्यांची बिले मंजूर करत असे. मात्र, वित्तीय अधिकार नियमपुस्तिकेनुसार विभाग प्रमुखांना असे अधिकार आधीच प्रदान करण्यात आले असल्याने आणि प्रशासकीय काम अधिक सुटसुटीत व्हावे या उद्देशाने हे काम आता संबंधित विभागांकडे वर्ग करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Viral Video : धावत्या बाईकवर उभे राहून तरुणाचा धोकादायक स्टंट; व्हिडीओ व्हायरल, सारण पोलिसांकडून FIR दाखल

Viral Video : सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी काही जण सार्वजनिक रस्त्यांवर धोकादायक स्टंट करत असल्याचे प्रकार

Gmail Storage : Google Photos आणि Gmail चे स्टोरेज फुल झाले? एकही रुपया खर्च न करता अशी रिकामी करा जागा

Gmail Storage: प्रत्येक Google अकाउंटसोबत 15 GB मोफत स्टोरेज मिळते. मात्र, हे स्टोरेज Google Drive, Google Photos आणि Gmail या तिन्ही सेवांसाठी

Bhuvan Bam : भुवन बामच्या अडचणी वाढल्या! गुजरातमधील विद्यापीठातील कार्यक्रमात अश्लील कृती केल्याचा आरोप; गुन्हा दाखल

Bhuvan Bam: प्रसिद्ध यूट्यूबर आणि कॉमेडियन भुवन बाम एका नव्या वादात अडकला आहे. गुजरातमधील वडोदरा येथील पारुल

BMC Health Policy : शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य योजनांचा लाभ, नागरी आरोग्य धोरणाचा मसुदा सार्वजनिक आरोग्य समितीसमोर सादर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) BMC Health Policy : निरोगी मुंबई आणि भविष्यकालीन सज्जतेसाठी मुंबई महानगरपालिकेने नागरी आरोग्य

Mumbai Pune Expressway : प्रवाशांसाठी खुशखबर! अटल सेतू आणि मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे लवकरच जोडले जाणार, 67 टक्के काम पूर्ण

Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ आणखी कमी होण्याची शक्यता आहे. अटल सेतूला थेट मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाशी

Jharkhand Accident News: पत्नीच्या शिक्षकपदी निवडीचा आनंद ठरला अखेरचा प्रवास; भीषण अपघातात 13 जणांचा मृत्यू

Jharkhand Accident News: पत्नीची शिक्षकपदी निवड झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी मंदिरात निघालेल्या एका कुटुंबावर काळाने घाला