Ramayan Movie : रामायणचा ट्रेलर रिलीज! रणबीर कपूर दिसणार दुहेरी भूमिकेत; अंगावर काटा आणणारा प्रसंग

मुंबई : रामायण’ ट्रेलरची सुरुवात रावणाच्या प्रवेशापासून होते. रावण प्रवेश करतो तेव्हा त्याला कोणी ओळखत नाही. ''मी तुमचा नवीन राजा'', असं म्हणत प्रवेशद्वार तोडून रावण आत येतो. एकूणच रावणाची दहशत, त्याची ताकद अनुभवायला मिळते. पुढे मर्यादापुरुषोत्तम श्रीराम दिसतात. डोळ्यांवर पट्टी बांधून घोडेस्वारी करत श्रीराम आकाशातून कोसळणाऱ्या घंटेचा अचूक वेध घेतात. त्यानंतर कैकेयी श्रीरामांना वनवासात जायला सांगते तो प्रसंग आपल्याला भावुक करतो. सीतेची आणि लक्ष्मणाची श्रीरामांना मिळालेली खंबीर साथ दिसते. अयोध्या सोडताना श्रीरामांच्या डोळ्यांत पाणी येतं.येत्या दिवाळीमध्ये हा सिनेमा रिलीज होणार असून आज समोर आलेल्या ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली. (Ramayan Movie)




या वर्षाच्या दिवाळीत पहिला भाग आणि २०२७ च्या दिवाळीत दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तब्बल ४ मिनिटे ९ सेकंदांच्या या ट्रेलरमध्ये विविध पौरणिक पात्रांची झलक पाहायला मिळणार आहे. मात्र, सिनेप्रेमींचे लक्ष वेधून घेतले आहे ते एका खास सीनने.




रणबीर कपूर या सिनेमात दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. तो यामध्ये'प्रभू श्रीराम' आणि 'प्रभू परशुराम' अशा दोन भूमिका साकारणार आहे. या दोन्ही पात्रांचं व्यक्तिमत्त्व पूर्णपणे वेगळं आहे. आता ट्रेलरमध्ये रणबीरचा परशुरामाच्या लूकची पहिली झलक पाहायला मिळते आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकतेचं वातावरण आहे. (Ranbir Kapoor)



ट्रेलरमधील एका सीनवर बारकाईने नजर टाकल्यास, लक्षात येते की सीता स्वयंवरानंतर अयोध्याकडे जाताना प्रभू श्रीराम आणि भगवान परशुराम यांची भेट होते.





रामायण सिनेमाचा ट्रेलर थेट पहाटे ब्रह्म मुहूर्तावर रिलीज करण्यात आला होता. प्रदर्शित होताच अवघ्या ६ तासांत यूट्यूबवर या ट्रेलरने ५० लाखांहून अधिक व्ह्यूजचा टप्पा ओलांडून नवा विक्रम रचला आहे.रणबीर कपूर, साई पल्लवी, यश आणि सनी देओल अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाला यातील संगीताने जागतिक दर्जा देण्याचे काम केले आहे. (Ramayan Trailer)

Comments
Add Comment

Rohit Sharma New Reality Show : क्रिकेटच्या मैदानावर सिक्सर मारणारा हिटमॅन आता टेलिव्हिजनचा TRP वाढवणार, रोहित शर्माचा नवा रिऍलिटी शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : सर्वांचा लाडका 'हिटमॅन' म्हणून ओळखला जाणारा क्रिकेटर रोहित शर्मा टीव्हीवर एक नवा रिएलिटी शो घेऊन येत आहे.

Badshah Isha Rikhi Divorce : अवघ्या ५ महिन्यांतच संपलं नातं! प्रसिद्ध गायक बादशाहचा घटस्फोट; सोशल मीडियावरील पोस्टने खळबळ

प्रसिद्ध रॅपर बादशाह आणि अभिनेत्री ईशा रिखी यांच्या नात्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. लग्नाच्या अवघ्या पाच

Kashmira Irani Pregnancy : अभिनेत्री कश्मिरा इराणीने दिली गुडन्यूज! ४०व्या वर्षी होणार आई; लग्नानंतर दोन वर्षांनी घरात येणार चिमुकला पाहुणा

मुंबई : बॉलिवूड आणि टेलिव्हिजन विश्वातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. लोकप्रिय अभिनेत्री कश्मिरा इराणी लवकरच

Mirzapur: The Movie : रिलीजपूर्वीच ‘मिर्झापूर: द मूव्ही’ चर्चेत; तब्बल ३ तास १७ मिनिटांचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

मुंबई : प्राइम व्हिडिओची गाजलेली मालिका 'मिर्झापूर' आता 'मिर्झापूर द मूव्ही' या नावाने मोठ्या पडद्यावर प्रदर्शित

Samay Raina : इंडियाज गॉट लेटेंट २' मध्ये नक्की काय घडलं? 'त्या' विनोदावरून समय रैनावर भाजपचे आमदार संतापले

मुंबई : स्टॅन्डअप कॉमेडियन समय रैना पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ‘इंडियाज गॉट लेटंट’च्या नुकत्याच

Imran Hashmi : अभिनेता इम्रान हाश्मीला H1N1ची लागण; प्रकृती बिघडल्याने बंगळुरूचा कार्यक्रमही पुढे ढकलला

मुंबई : अभिनेता इम्रान हाश्मीला स्वाइन फ्लू अर्थात H1N1 विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. शूटिंगच्या