Arbaz Shaikh : अभिनेता अरबाज शेखवर दुःखाचा डोंगर; वडील अस्लम शेख यांचे उपचारादरम्यान निधन; उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली होती आर्थिक मदत

ब्रेन हॅमरेजमुळे महिनाभर सुरू होती उपचारांची झुंज; मदतीसाठी केलेला भावनिक व्हिडिओ ठरला होता चर्चेचा विषय


'सैराट' चित्रपटातून लोकप्रिय झालेला अभिनेता अरबाज शेख याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याचे वडील अस्लम शेख यांचे आज उपचारादरम्यान निधन झाले. ब्रेन हॅमरेज झाल्यानंतर गेल्या महिनाभरापासून सोलापूरमधील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचार सुरू असतानाच आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर विविध स्तरांतून हळहळ व्यक्त केली जात आहे. (Arbaz Shaikh)



काही दिवसांपूर्वी अरबाज शेखने वडिलांच्या उपचारासाठी आर्थिक मदतीची आणि योग्य वैद्यकीय उपचारांची विनंती करत सोशल मीडियावर भावनिक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये त्याने सोलापूरमधील नोबेल हॉस्पिटलवर मेडिकलमधूनच औषधे खरेदी करण्याची सक्ती केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणाची दखल घेत अन्न व औषध प्रशासनाने (FDA) संबंधित मेडिकल दुकानांवर तपासणी करून कारवाई केली होती. (Sairat Movie)


अरबाजच्या व्हिडिओची दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मदतीसाठी पुढाकार घेतला होता. शिवसेना वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्या समन्वयातून सोलापूरमधील डॉ. वळसंगकर हॉस्पिटलने उपचाराची जबाबदारी स्वीकारली होती. डॉ. अश्विन वळसंगकर यांनी आवश्यक ती वैद्यकीय मदत देण्याचे आश्वासन दिले होते. (Eknath Shinde)


अस्लम शेख यांच्यावर सुरुवातीला सोलापूरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मेंदूविकारामुळे त्यांची प्रकृती गंभीर होती. वडिलांना वाचवण्यासाठी अरबाजने सर्वतोपरी प्रयत्न केले. "मला माझ्या वडिलांना वाचवायचं आहे," असे म्हणत त्याने अश्रूंनी भरलेला व्हिडिओ शेअर केला होता. मात्र, अखेर त्यांच्या मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली. (Arbaz Shaikh)


अस्लम शेख यांच्या निधनामुळे शेख कुटुंबावर शोककळा पसरली असून, चाहत्यांसह चित्रपटसृष्टीतील अनेकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Comments
Add Comment

Rohit Sharma New Reality Show : क्रिकेटच्या मैदानावर सिक्सर मारणारा हिटमॅन आता टेलिव्हिजनचा TRP वाढवणार, रोहित शर्माचा नवा रिऍलिटी शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : सर्वांचा लाडका 'हिटमॅन' म्हणून ओळखला जाणारा क्रिकेटर रोहित शर्मा टीव्हीवर एक नवा रिएलिटी शो घेऊन येत आहे.

Badshah Isha Rikhi Divorce : अवघ्या ५ महिन्यांतच संपलं नातं! प्रसिद्ध गायक बादशाहचा घटस्फोट; सोशल मीडियावरील पोस्टने खळबळ

प्रसिद्ध रॅपर बादशाह आणि अभिनेत्री ईशा रिखी यांच्या नात्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. लग्नाच्या अवघ्या पाच

Kashmira Irani Pregnancy : अभिनेत्री कश्मिरा इराणीने दिली गुडन्यूज! ४०व्या वर्षी होणार आई; लग्नानंतर दोन वर्षांनी घरात येणार चिमुकला पाहुणा

मुंबई : बॉलिवूड आणि टेलिव्हिजन विश्वातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. लोकप्रिय अभिनेत्री कश्मिरा इराणी लवकरच

Mirzapur: The Movie : रिलीजपूर्वीच ‘मिर्झापूर: द मूव्ही’ चर्चेत; तब्बल ३ तास १७ मिनिटांचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

मुंबई : प्राइम व्हिडिओची गाजलेली मालिका 'मिर्झापूर' आता 'मिर्झापूर द मूव्ही' या नावाने मोठ्या पडद्यावर प्रदर्शित

Samay Raina : इंडियाज गॉट लेटेंट २' मध्ये नक्की काय घडलं? 'त्या' विनोदावरून समय रैनावर भाजपचे आमदार संतापले

मुंबई : स्टॅन्डअप कॉमेडियन समय रैना पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ‘इंडियाज गॉट लेटंट’च्या नुकत्याच

Imran Hashmi : अभिनेता इम्रान हाश्मीला H1N1ची लागण; प्रकृती बिघडल्याने बंगळुरूचा कार्यक्रमही पुढे ढकलला

मुंबई : अभिनेता इम्रान हाश्मीला स्वाइन फ्लू अर्थात H1N1 विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. शूटिंगच्या