Ramayana Movie : हनुमानाची झलक ट्रेलरमधून का बाद? 'गदर' फेम अभिनेत्याने सोडले मौन

मुंबई: दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या बहुप्रतीक्षित आणि महत्त्वाकांक्षी 'रामायण: पार्ट १' या चित्रपटाचा थरारक ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, त्याने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. या ४ मिनिटे १० सेकंदांच्या तुफान व्हिडिओमध्ये प्रभू श्रीरामाच्या भूमिकेतील रणबीर कपूरचा सोज्वळपणा, सीतेच्या रूपातील साई पल्लवीचे सौंदर्य आणि रावणाच्या भूमिकेत साऊथ सुपरस्टार यशचा महाभयंकर अवतार प्रेक्षकांना थक्क करून सोडणारा आहे. मात्र, हा धमाकेदार ट्रेलर पाहिल्यानंतर चित्रपटप्रेमींच्या मनात एक मोठा प्रश्न निर्माण झाला, तो म्हणजे "रामभक्त हनुमान कुठे आहेत?"



'रामायण' महाकाव्यात हनुमानाच्या पात्राला अत्यंत महत्त्वाचे आणि आदराचे स्थान आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता सनी देओल हनुमानाची भूमिका साकारत आहे. त्यामुळे त्याला मोठ्या पडद्यावर बजरंगबलीच्या अवतारात पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक होते. परंतु, संपूर्ण ट्रेलरमध्ये हनुमानाची साधी झलकही पाहायला न मिळाल्यामुळे अनेक चाहत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आणि सोशल मीडियावर यावरून विविध चर्चांना उधाण आले.



चाहत्यांच्या या वाढत्या प्रश्नांची दखल घेत दिल्लीत पार पडलेल्या ग्रँड ट्रेलर लाँच सोहळ्यात खुद्द सनी देओलने पुढे येत यामागचे मूळ कारण स्पष्ट केले. चाहत्यांची उत्सुकता वाढवत तो म्हणाला, "मी नुकतीच या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे, त्यामुळे माझ्या भागाचे शूटिंग अद्याप फारसे झालेले नाही."



याशिवाय, चित्रपटाच्या कथानकाबद्दल माहिती देताना त्यांनी सांगितले की, 'रामायण: पार्ट १' ची कथा प्रामुख्याने प्रभू श्रीरामांचे बालपण, सीता स्वयंवर, रावणाचा भूतकाळ आणि सीताहरणाभोवती फिरणारी आहे. त्यामुळे भक्त हनुमानाची भव्य एन्ट्री प्रेक्षकांना प्रामुख्याने 'पार्ट २' मध्येच पाहायला मिळणार आहे. सनी देओलच्या या स्पष्टीकरणामुळे चाहत्यांच्या मनातील सर्व शंकांचे निरसन झाले असून, आता बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट कमाईचे कोणते नवे विक्रम प्रस्थापित करतो, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

KHK 2026: धकधक गर्लचा नवा अंदाज! 'कोण होणार करोडपती'च्या पहिल्याच भागाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि 'धक-धक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित सध्या 'कोण होणार करोडपती'

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

‘पुन्हा नक्की भेटू’ २३ ऑक्टोबरला रंगभूमीवर; नाटकाच्या निमित्ताने मुक्ता आणि मीरा यांची नाट्यक्षेत्रात नवी भरारी

काही नाती काळाच्या ओघात अधिक घट्ट होतात, तर काही नाती नव्या सर्जनशील वाटा खुल्या करतात ज्या नवरात्रीत देवीच्या

Salman Khan : ‘तू असा ड्रेस घालून...’; करिश्मा कपूरच्या ड्रेसवर सलमान खानने घेतला होता आक्षेप, Video Viral

Salman Khan-Karisma Kapoor: बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या जुन्या आठवणींना ‘कॉफी विथ करण’च्या

Chikeezing Movie Teaser: बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारा ‘चिकीझिंग’चा टीझर प्रदर्शित, 19 नोव्हेंबरला चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Chikeezing Movie Teaser : बालपणातील निरागस आठवणी, मोठी स्वप्ने आणि ती पूर्ण करण्याची जिद्द यांचा सुंदर संगम असलेला ‘चिकीझिंग’

Drishyam : ‘दृश्यम 3' चा बॉक्स ऑफिसवर जलवा ! आता 'दृश्यम 4’ येणार ? दिग्दर्शकाने स्पष्टच सांगितलं...

Drishyam 3 : अभिनेता अजय देवगणच्या ‘दृश्यम’ चित्रपट मालिकेने प्रेक्षकांमध्ये मोठी लोकप्रियता मिळवली आहे. रहस्य, थरार