Kirit Somaiya : ४० लाख बांग्लादेशींनी खोट्या कागदपत्रांआधारे भरले 'एसआयआर' फॉर्म; किरीट सोमय्यांचा दावा

मशिदींमधून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असल्याचा आरोप



मुंबई : विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेअंतर्गत महाराष्ट्रात आतापर्यंत ४० लाखांहून अधिक बांगलादेशी नागरिकांनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे गणना पत्र (इन्यूमरेशन फॉर्म) भरल्याचा खळबळजनक दावा भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. मशिदींमधून मोठ्या प्रमाणावर हे बोगस फॉर्म भरून घेतले जात असून, महाराष्ट्राच्या मतदार यादीत एकाही बांगलादेशी नागरिकाचे नाव राहू देणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.



वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना माध्यमांशी बोलताना किरीट सोमय्या यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, मशिदींच्या माध्यमातून बोगस अर्ज भरण्याची मोहीम राबवली जात आहे. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे स्थानिक रहिवासी नसलेल्या व मूळच्या बांगलादेशी असलेल्या सुमारे आठ हजार व्यक्तींनी गणना पत्रे भरली आहेत. या सर्व संशयास्पद आणि बोगस अर्जांवर भाजपच्या वतीने आक्षेप नोंदवण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.



'एसआयआर' अंतर्गत अर्ज भरण्यासाठी निवडणूक आयोगाने ८ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे. या प्रक्रियेचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून, केवळ आठ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. राज्यातील सुमारे ३० टक्के मतदारांनी अद्याप आपले गणना पत्र भरलेले नाही. त्यामुळे सर्व वैध व पात्र मतदारांनी विनाविलंब आपले फॉर्म भरून मतदार यादीतील आपले स्थान निश्चित करावे, असे आवाहनही सोमय्या यांनी या वेळी केले.

Comments
Add Comment

Manori Desalination Project : मनोरीतील समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्पाला कोळी बांधवांच्या विरोधाची किनार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकरांची वाढती लोकसंख्या, पाण्याची मागणी लक्षात घेता पाण्याच्या मागणीतील ही तफावत

Maharashtra Weather Update: मुंबई-ठाण्यात उष्णतेचा इशारा; कोकणासह देशातील अनेक भागांत पावसाची शक्यता

Maharashtra Weather Update: देशातून नैऋत्य मान्सूनने पूर्णपणे माघार घेतली असली, तरी देशातील हवामानातील बदल सुरूच आहेत. बंगालचा

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म