Arbaz Shaikh : प्राणज्योत मालवली; सैराट मधील 'सल्या'ची दु:खद पोस्ट

महाराष्ट्रात गाजलेल्या 'सैराट' चित्रपटातील 'सल्या' म्हणजे अरबाज शेख याच्या वडिलांचे निधन झाले आहे. या मुळे अरबाज आणि त्याच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.


अरबाज चे वडील अस्लम शेख यांना ब्रेन हॅमरेज झालं होतं. गेल्या महिन्याभरापासून त्यांना सोलापूरमधील खासगी रुग्णालयात (Private Hospital) दाखल करून उपचार सुरु होते. परंतु दुर्दैवाने त्यांची प्राणज्योत मावळली. गेल्या काही दिवसापूर्वी अरबाजने सोशल मिडीयावर एक व्हिडीओ शेअर केला होता ज्यामध्ये अत्यंत दु:खी अवस्थेत तो म्हणाला होता मला माझ्या वडीलांना मरताना पहायचे नाही.



वडि‍लांच्या निधनानंतर अरबाजने आता पहिली पोस्ट शेअर करत त्याचे दु:ख व्यक्त केले आहे. वडिलांना वाचवण्यासाठी अरबाजनं खूप धावपळ केली होती, खूप मेहनत घेतली होती मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अरबाजने ज्या रुग्णालयात त्याच्या वडिलांना दाखल केलं होतं, तिथं औषधांच्या नावाने लूट होत असल्याचं एका व्हिडीओ मधून निदर्शनास आणून दिलं होतं. ज्याची दखल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अन्न आणि औषध प्रशासनानेही (Food and Drug Administration) घेतली होती.



पण अरबाजने तो व्हिडीओ शेअर केल्याच्या काही तासांनी डिलीट केला. त्यानंतर आणखी एक पोस्ट करत व्हिडीओ डिलीट करण्याचं कारणही सांगितलं होतं. आपल्यासाठी आपले वडील आणि कुटुंब प्राथमिकता (Priority) असल्याचं त्याने सांगितलं होतं.


वडिलांच्या निधनानंतर अरबाजने त्यांचा शेवटचा फोटो शेअर केला आहे, ज्यात हॉस्पिटल मध्ये असताना वडिलांनी त्याचा हात घट्ट धरला होता.


Comments
Add Comment

Rohit Sharma New Reality Show : क्रिकेटच्या मैदानावर सिक्सर मारणारा हिटमॅन आता टेलिव्हिजनचा TRP वाढवणार, रोहित शर्माचा नवा रिऍलिटी शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : सर्वांचा लाडका 'हिटमॅन' म्हणून ओळखला जाणारा क्रिकेटर रोहित शर्मा टीव्हीवर एक नवा रिएलिटी शो घेऊन येत आहे.

Badshah Isha Rikhi Divorce : अवघ्या ५ महिन्यांतच संपलं नातं! प्रसिद्ध गायक बादशाहचा घटस्फोट; सोशल मीडियावरील पोस्टने खळबळ

प्रसिद्ध रॅपर बादशाह आणि अभिनेत्री ईशा रिखी यांच्या नात्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. लग्नाच्या अवघ्या पाच

Kashmira Irani Pregnancy : अभिनेत्री कश्मिरा इराणीने दिली गुडन्यूज! ४०व्या वर्षी होणार आई; लग्नानंतर दोन वर्षांनी घरात येणार चिमुकला पाहुणा

मुंबई : बॉलिवूड आणि टेलिव्हिजन विश्वातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. लोकप्रिय अभिनेत्री कश्मिरा इराणी लवकरच

Mirzapur: The Movie : रिलीजपूर्वीच ‘मिर्झापूर: द मूव्ही’ चर्चेत; तब्बल ३ तास १७ मिनिटांचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

मुंबई : प्राइम व्हिडिओची गाजलेली मालिका 'मिर्झापूर' आता 'मिर्झापूर द मूव्ही' या नावाने मोठ्या पडद्यावर प्रदर्शित

Samay Raina : इंडियाज गॉट लेटेंट २' मध्ये नक्की काय घडलं? 'त्या' विनोदावरून समय रैनावर भाजपचे आमदार संतापले

मुंबई : स्टॅन्डअप कॉमेडियन समय रैना पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ‘इंडियाज गॉट लेटंट’च्या नुकत्याच

Imran Hashmi : अभिनेता इम्रान हाश्मीला H1N1ची लागण; प्रकृती बिघडल्याने बंगळुरूचा कार्यक्रमही पुढे ढकलला

मुंबई : अभिनेता इम्रान हाश्मीला स्वाइन फ्लू अर्थात H1N1 विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. शूटिंगच्या