Pune Traffic Update : अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त पुण्यात वाहतुकीत मोठे बदल; 'हे' रस्ते राहणार बंद, पर्यायी मार्गांची घोषणा

1 ऑगस्ट रोजी सारसबाग परिसरात विशेष वाहतूक नियोजन; नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन



पुणे : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ( Annabhau Sathe Jayanti) यांच्या जयंतीनिमित्त 1 ऑगस्ट रोजी पुण्यातील (Pune) सारसबाग परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन पुणे वाहतूक शाखेने विशेष वाहतूक नियोजन जाहीर केले आहे. विविध सामाजिक संघटना, स्थानिक मंडळे आणि राजकीय पक्षांचे कार्यकर्ते मिरवणुकांसह सारसबाग येथील पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी येणार असल्याने दुपारी 2 वाजल्यापासून आवश्यकतेनुसार वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत.


वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जेधे चौक ते सारसबाग हा मार्ग अत्यावश्यक सेवेतील वाहनांशिवाय इतर सर्व वाहनांसाठी बंद राहणार आहे. सिंहगड रोडकडे जाणाऱ्या वाहनांनी सातारा रोड, व्होल्गा चौक, मित्रमंडळ चौक आणि सावरकर चौकमार्गे पर्यायी मार्गाचा वापर करावा. तर सिंहगड रोडवरून स्वारगेटकडे येणाऱ्या वाहनांसाठी दांडेकर पूल, नाथ पै चौक, ना. सी. फडके चौक, पुरम चौक आणि टिळक रोड हा पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे. (Pune Traffic)



जेधे चौकातील वाय-जंक्शन (फ्लायओव्हर) वरून सारसबागकडे जाण्यास मनाई करण्यात आली आहे. कात्रजकडून येणाऱ्या वाहनांनी लक्ष्मीनारायण (व्होल्गा चौक) येथून डावीकडे वळून इच्छित स्थळी जावे. तसेच वेगा सेंटर ते सारसबाग ग्रेड सेपरेटर वाहतुकीसाठी बंद राहणार असून, वाहनांना वेगा सेंटर, घोरपडे पेठ उद्यान, राष्ट्रभूषण चौक आणि हिराबाग चौकमार्गे वळवण्यात येणार आहे.


याशिवाय सावरकर चौक ते पुरम चौक आणि दांडेकर पूल ते सावरकर चौक या मार्गांवरील वाहतुकीतही बदल करण्यात आले आहेत. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुरम चौक ते जेधे चौक या एकेरी रस्त्यावर तात्पुरत्या स्वरूपात दुहेरी वाहतूक सुरू करण्यात येणार आहे. दुपारी 3 ते रात्री 12 वाजेपर्यंत दांडेकर पूल आणि सावरकर चौक येथेही आवश्यकतेनुसार दुहेरी वाहतुकीची व्यवस्था करण्यात येईल. ( Pune Traffic Update)


सातारा रोडवरून मित्रमंडळ चौकमार्गे येणाऱ्या अनुयायांनी आपल्या दुचाकी पाटील प्लाझा येथे पार्क कराव्यात, असेही आवाहन करण्यात आले आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पुणे वाहतूक शाखेने केले आहे.

Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी