Nashik Simhastha Kumbh Mela : साधुग्राममधील प्रत्येक सुविधा भाविकांच्या सुरक्षिततेला पूरक ठरावी - डॉ. प्रवीण गेडाम

Nashik Simhastha Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे उभारण्यात येणाऱ्या साधुग्रामच्या नियोजनात भाविकांची सुरक्षितता, गर्दी व्यवस्थापन, वाहतूक व्यवस्था, नदी संवर्धन, जलनिस्सारण, आपत्कालीन सेवा, अखाड्यांच्या सुविधा आणि भविष्यातील गरजा लक्षात घेऊन आराखडा तयार करावा, अशा सूचना नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम (Dr. Pravin Gedam) यांनी दिल्या. विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित साधुग्राम नियोजन आढावा बैठकीत ते बोलत होते. (Nashik Simhastha Kumbh Mela)



सर्व विभागांनी वेळेत कामे पूर्ण करण्याच्या सूचना


नाशिक व त्र्यंबकेश्वर साधुग्रामसाठी भाविकसंख्या, पायाभूत सुविधा व तांत्रिक निकषांच्या आधारे नियोजनाचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी डॉ. गेडाम यांनी घाटांची जास्तीत जास्त लांबी भाविकांसाठी उपलब्ध ठेवावी, गर्दी नियंत्रणासाठी रस्ते, घाट, पार्किंग व पादचारी मार्गांचे वैज्ञानिक नियोजन करावे तसेच सर्व विभागांनी समन्वयातून वेळेत कामे पूर्ण करावीत, अशा सूचना दिल्या. महावितरणच्या उच्चदाब वीजवाहिन्यांमुळे प्रभावित होणाऱ्या भूखंडांचा आढावा घेऊन वीजवाहिन्यांच्या पुनर्संरेखनाचा पर्याय विचारात घेण्यात आला. साधुग्राममधील घाट, रस्ते, रिंग रोड, पादचारी मार्ग, वाहतूक व्यवस्था, पार्किंग, टेंट सिटी, अखाड्यांचे भूखंड, नदी संरक्षित पट्टा, जलनिस्सारण व्यवस्था, सार्वजनिक सुविधा आणि भविष्यातील विस्तारासाठी आवश्यक जागेच्या नियोजनावरही चर्चा झाली.
((Nashik Simhastha Kumbh Mela))



प्रस्तावित साधुग्राम आराखड्याचे सादरीकरण


अखाड्यांच्या पारंपरिक स्थानांचा सन्मान राखून भूखंडांचे नियोजन, नदीकाठच्या परिस्थितीनुसार घाटांचा विकास, भाविकांच्या सुरक्षित हालचालीसाठी रस्त्यांची योग्य रुंदी, बॅरिकेडिंग, पाणीपुरवठा, स्वच्छता, वीजपुरवठा व आरोग्य सुविधांचे एकात्मिक नियोजन करण्यावर बैठकीत भर देण्यात आला. यावेळी कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी प्रस्तावित साधुग्राम आराखड्याचे सादरीकरण केले. मागील सिंहस्थातील अनुभव, विविध विभागांशी झालेली चर्चा, स्थळ पाहणी, अखाड्यांच्या सूचना, अपेक्षित भाविकसंख्या व भविष्यातील गरजा लक्षात घेऊन तयार केलेल्या आराखड्याची माहिती त्यांनी दिली. ((Nashik Simhastha Kumbh Mela))



बैठकीत कोण उपस्थित होते ?


बैठकीस पोलीस आयुक्त डॉ. संदीप कर्णिक, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक संजय ऐनपुरे, कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी डॉ. जयकुमार आढे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा, पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, महावितरणचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे, त्र्यंबक नगर परिषदेचे मुख्याधिकारी गोविंद जाधव, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, किशोर काळे तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण