Nagpur Researcher : नागपूरच्या संशोधकांचा विज्ञानाच्या विश्वात क्रांतिकारी शोध; आता रात्रीच्या अंधारातही होणार सौरऊर्जा निर्मिती!

NAGPUR : सौरऊर्जा निर्मितीसाठी आता कडक उन्हाची किंवा प्रखर सूर्यप्रकाशाची गरज पडण्याची मार्यादा संपुष्टात आली आहे. नागपूरच्या संशोधकांनी विज्ञानाच्या क्षेत्रात एक ऐतिहासिक पाऊल टाकत चक्क रात्रीच्या अंधारात आणि ढगाळ वातावरणातही चोवीस तास सौरऊर्जा निर्माण करण्याचे अनोखे तंत्रज्ञान यशस्वीपणे विकसित केले आहे. या अप्रतिम संशोधनामुळे भविष्यातील वीज टंचाईवर मोठी मात करणे शक्य होणार असून, या आंतरराष्ट्रीय शोधाची गंभीर दखल घेत ब्रिटनने या महत्त्वपूर्ण तंत्रज्ञानाला 'युके डिझाइन'चे (UK Design) पेटंट प्रमाणपत्रही बहाल केले आहे.



नागपूर विद्यापीठाच्या संशोधकांचा अभूतपूर्व प्रयोग


राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. संजय ढोबळे आणि लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठाचे (LITU) प्राध्यापक डॉ. विजय पावडे यांनी संयुक्तपणे हे नाविन्यपूर्ण संशोधन साकारले आहे. बाजारात सध्या दोन्ही बाजूने ऊर्जा निर्माण करू शकणारे 'बायफेशियल' सोलर पॅनल उपलब्ध असले, तरी सूर्यप्रकाश कमी झाल्यावर किंवा रात्र झाल्यावर त्यांची वीज निर्मिती पूर्णपणे खंडित होते. या मुख्य समस्येवर मात करण्यासाठी संशोधकांनी बायफेशियल सोलर पॅनलच्या वर आणि खाली विशेष स्वरूपाचे एलईडी (LED) दिवे बसवण्याचा अनोखा मार्ग शोधला आहे.



अशी होते सूर्याशिवाय रात्रीच्या वेळी वीज निर्मिती


या स्वयंचलित यंत्रणेनुसार, दिवसाच्या वेळी वाऱ्यापासून मिळणारी पवनऊर्जा साठवून ठेवली जाते. रात्री सूर्यप्रकाश मावळताच एका आधुनिक सेन्सरच्या मदतीने हे एलईडी दिवे आपोआप सुरू होतात. या दिव्यांच्या कृत्रिम प्रकाशामुळे सोलर पॅनल रात्रीच्या अंधारातही पुन्हा सक्रिय होतात आणि सातत्याने वीज तयार करू लागतात. विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रक्रियेसाठी बाहेरील कोणत्याही अतिरिक्त विजेची गरज भासत नाही. ही यंत्रणा स्वतःच निर्माण केलेल्या ऊर्जेवर पूर्णपणे मोफत आणि स्वयंचलित पद्धतीने अखंडितपणे काम करते.



भविष्यातील ऊर्जा संकटावर प्रभावी उपाय


पारंपरिक ऊर्जा स्त्रोत दिवसेंदिवस मर्यादित होत चालल्यामुळे, कृत्रिम प्रकाशाच्या माध्यमातून रात्रंदिवस अखंड वीज तयार करणारे हे तंत्रज्ञान भविष्यात ऊर्जा क्षेत्रासाठी एक मैलाचा दगड ठरणार आहे. या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून सर्वसामान्य नागरिकांच्या घरांचे विजेचे बिल शून्यावर आणणे, तसेच उद्योगधंदे आणि रस्त्यांवरील दिव्यांना २४ तास मोफत वीज पुरवणे शक्य होणार आहे. या जागतिक पातळीवरील महत्त्वपूर्ण यशाबद्दल नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर यांच्यासह शैक्षणिक व वैज्ञानिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी दोन्ही संशोधकांचे विशेष अभिनंदन केले आहे.

Comments
Add Comment

Jaykumar Rawal : अत्याधुनिक सुविधा आणि सुरक्षिततेला प्राधान्य देत मुंबई विमानतळाजवळ ‘नंदगिरी राज्य अतिथीगृह’ उभारणार; मंत्री जयकुमार रावल यांची माहिती

मुंबई : विविध राज्यांतून मुंबईत येणाऱ्या मान्यवर अतिथींच्या निवासासोबतच ट्रान्झिट प्रवासादरम्यान

Nitesh Rane : मालेगावमध्ये आधुनिक मासळी बाजार उभारणीला गती

- सांगलीतील प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश मुंबई : वाशिम जिल्ह्यातील

Nitesh Rane : सिंधुदुर्गात कुक्कुटपालनाला चालना देण्यासाठी प्रभावी कार्यवाहीचे निर्देश; मंत्री नितेश राणे यांची माहिती

कुक्कुटपालनाला 'कृषी समकक्ष' दर्जा दिल्याने युवकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यात

ITR Filing 2026 : देशात आयटीआर भरणाऱ्यांचा विक्रमी आकडा; ७.८ कोटींचा टप्पा पार

नवी दिल्ली : देशात आयकर रिटर्न (आयटीआर) दाखल करणाऱ्यांची संख्या विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. मूल्यांकन वर्ष

Chandrashekhar Bawankule : अर्थसंकल्पातील मंजूर निधी ओबीसी मंत्रालयाला द्या; ओबीसी मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी

ओबीसी महामंडळांचे प्रश्न डिसेंबरपर्यंत मार्गी परदेशी शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थी संख्या वाढविणार बैठकीत १३

Russia Ukraine War : रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात एका भारतीयासह १२ जणांचा मृत्यू

कीव्ह : रशियाने युक्रेनवर रात्रभर केलेल्या भीषण हवाई हल्ल्यात एका भारतीय नागरिकाचा आणि इतर ११ जणांचा अशा एकूण १२