Ashok Kharat News : अशोक खरात आता शिर्डी पोलिसांच्या ताब्यात; नवीन धागेदोरे मिळणार ?

Ashok Kharat News : नाशिकच्या बहुचर्चित अशोक खरात प्रकरणात मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. समता पतसंस्थेतील शंभर बनावट खात्यांच्या गाजलेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य आरोपी अशोक खरात (Ashok Kharat) याला नाशिक एसआयटीने पुन्हा ताब्यात घेत शुक्रवारी शिर्डी पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. यापूर्वी शिर्डीतील जमीन खरेदी प्रकरणात झालेल्या चौकशीत अनेक धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले होते. त्यातूनच समता पतसंस्थेतील कथित कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराचा आणि शंभर बनावट खात्यांचा मोठा घोटाळा उघडकीस आला होता. (Ashok Kharat News )



नवीन धागेदोरे मिळणार ?


अशोक खरात याला ताब्यात घेतल्यानंतर या प्रकरणातील आर्थिक व्यवहारांचे नेमके स्वरूप, बोगस खाती उघडण्यामागील सूत्रधार, व्यवहारात सहभागी असलेले इतर संशयित तसेच पतसंस्थेतील अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांची भूमिका याबाबत चौकशी केली जाणार आहे. त्यामुळे या चौकशीतून आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे.(Ashok Kharat News )



खातेप्रकरणाच्या तपासासाठी खरात ताब्यात


शिर्डीतील जमीन प्रकरणातील (Shirdi land case) चौकशी पूर्ण झाल्यानंतर अशोक खरातला पुन्हा नाशिक एसआयटीच्या (Nashik SIT) ताब्यात देण्यात आले होते. त्यानंतर समता पतसंस्थेतील 100 बनावट खातेप्रकरणाच्या तपासासाठी एसआयटीने त्याचा ताबा घेतला असून शुक्रवारी रात्री त्याला नाशिकहून शिर्डी पोलीस ठाण्यात (Shirdi Police Station) आणण्यात आले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली असून राहाता ग्रामीण रुग्णालयात (Rahata Rural Hospital) त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. शनिवारी दुपारी अशोक खरातला राहाता न्यायालयात (Rahata Court) हजर करण्यात येणार असून पुढील तपासासाठी दहा दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली जाणार आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास एसआयटीचे अधिकारी तथा शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती करीत आहेत.

Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Maharashtra SIR Voter List : राज्यातील विधानसभा मतदारसंघांच्या प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध

- २ कोटींहून अधिक मतदारांची नावे वगळली; ३० सप्टेंबरपर्यंत दाखल करता येणार हरकती  मुंबई : विशेष सखोल पुनरिक्षण

Elon Musk :‘फक्त शाश्वत ऊर्जा पुरेशी नाही’; पृथ्वीच्या भवितव्याबाबत एलॉन मस्क यांचा मोठा इशारा

टेस्ला आणि स्पेसएक्सचे प्रमुख एलॉन मस्क यांनी पृथ्वीच्या दीर्घकालीन भवितव्याबाबत महत्त्वाचा इशारा दिला आहे.

Jalgaon Crime : संतापजनक ! ‘दुधा’च्या नावाखाली काळा धंदा ! गायीच्या दुधात चक्क 'या' तेलाची भेसळ अन् पुढे...

Jalgaon Crime : गायीच्या दुधात थेट सोयाबीन तेल मिसळून त्याची फॅट वाढवायची आणि हेच भेसळयुक्त दूध ‘म्हशीचे दूध’ म्हणून

Ulhasnagar Stamp Duty Amnesty Scheme : उल्हासनगरवासीयांना दिलासा! अभय योजनेला मुदतवाढ देण्याचा बावनकुळेंचा निर्णय

मुंबई : उल्हासनगर शहरातील प्रलंबित मुद्रांक शुल्क प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी "महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय

Maharashtra Professor Recruitment : प्राध्यापकांच्या भरतीसाठी मुलाखतींचे 'सीसीटीव्ही रेकॉर्डिंग' बंधनकारक

- उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय; अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये ५ हजार १२ पदांची भरती मुंबई :