Asmita Dey : सायकल दुरुस्ती करणाऱ्या वडिलांची मुलगी ठरली 'सुवर्णकन्या'; अस्मिता डेने राष्ट्रकुल स्पर्धेत रचला इतिहास

Commonwealth Games 2026 : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 भारताच्या अस्मिता डे (Asita Dey) हिने ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकत देशाचे नाव उंचावले आहे. महिलांच्या 48 किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात तिने कॅनडाच्या हेडी क्वाचचा 2-1 असा पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवला. राष्ट्रकुल स्पर्धेतील हे तिच्या कारकिर्दीतील सर्वात मोठे यश मानले जात आहे.

त्रिपुरातील बेलोनिया येथील साध्या कुटुंबातून आलेल्या अस्मिताचा हा प्रवास अनेक संघर्षांनी भरलेला आहे. तिचे वडील अर्जुन कुमार डे सायकल दुरुस्तीचे छोटे दुकान चालवतात. मर्यादित उत्पन्न असूनही त्यांनी मुलीच्या शिक्षणासह क्रीडा प्रशिक्षणासाठी कोणतीही कसर ठेवली नाही. तीन भावंडांमध्ये सर्वात लहान असलेल्या अस्मिताला तिच्या कुटुंबाचा कायम पाठिंबा मिळाला.



लहानपणी अस्मिताला धावण्याची आवड होती. ती 800 मीटर शर्यतीत सहभागी होत असे आणि जिल्हास्तरावर चांगली कामगिरीही केली होती. मात्र, तिची शारीरिक क्षमता आणि चपळता पाहून प्रशिक्षकांनी तिला ज्युडोकडे वळण्याचा सल्ला दिला. हा निर्णय तिच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा टप्पा ठरला.


2015 मध्ये अस्मिताला त्रिपुरा स्पोर्ट्स स्कूलमध्ये प्रवेश मिळाला. तेथे प्रशिक्षक बिना देबनाथ आणि माणिक लाल देब यांच्या मार्गदर्शनाखाली तिने ज्युडोचे प्रशिक्षण घेतले. शालेय आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण यश मिळाल्यानंतर तिची भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (SAI) भोपाळ येथील प्रादेशिक प्रशिक्षण केंद्रासाठी निवड झाली. अत्याधुनिक प्रशिक्षण आणि अनुभवी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे तिच्या खेळात आणखी सुधारणा झाली.


राष्ट्रकुल स्पर्धेपूर्वीही अस्मिताने अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताला यश मिळवून दिले आहे. 2022 मध्ये बँकॉक येथे झालेल्या आशियाई कॅडेट आणि ज्युनियर ज्युडो स्पर्धेत तिने कांस्यपदक जिंकले होते. त्यानंतर ज्युनियर आशिया कप, खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्समध्ये सुवर्णपदके आणि कुवेत सिटी आशियाई ओपनमध्ये रौप्यपदकही तिच्या नावावर जमा झाले. सातत्यपूर्ण कामगिरीमुळे तिची 'टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्कीम' (TOPS) मध्येही निवड झाली.


राष्ट्रकुल स्पर्धेतील हे सुवर्णपदक अस्मिता डेच्या मेहनतीचे, जिद्दीचे आणि तिच्या कुटुंबाच्या संघर्षाचे मोठे यश मानले जात आहे.




Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून