Commonwealth Games 2026 : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला दुहेरी आनंद; नीरजने जिंकले रौप्य, यशवीरने पटकावले कांस्य

 Commonwealth Games 2026 : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये भारताच्या भालाफेकपटूंनी शानदार कामगिरी करत पुरुषांच्या भालाफेक प्रकारात दोन पदके जिंकली. शुक्रवारी रात्री उशिरा झालेल्या अंतिम फेरीत नीरज चोप्राने रौप्यपदक, तर यशवीर सिंगने कांस्यपदक आपल्या नावावर केले. श्रीलंकेच्या रुमेश थरंगा पाथिराजाने सर्वाधिक 89.75 मीटर भालाफेक करत सुवर्णपदक पटकावले. (Neeraj Chopra)



ऑलिम्पिक पदक विजेता नीरज चोप्राने स्पर्धेची सुरुवात 80.97 मीटर फेकीने केली. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात त्याने 85.83 मीटर अंतर गाठत हंगामातील सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. पुढील प्रयत्नांमध्ये त्याने 81.29 मीटर आणि 80.73 मीटर अशी फेक केली. मात्र, श्रीलंकेच्या रुमेश पाथिराजाच्या दमदार कामगिरीमुळे नीरजला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. (Yashvir Singh)


यशवीर सिंगनेही स्पर्धेत लक्षवेधी कामगिरी केली. सुरुवातीच्या प्रयत्नांनंतर त्याने सातत्याने आपली कामगिरी उंचावली. अखेरच्या प्रयत्नात त्याने 85.41 मीटर अंतर गाठत कांस्यपदक जिंकले. विशेष म्हणजे ही त्याच्या कारकिर्दीतील वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी ठरली. (CommanWealth Games)


भारताचा आणखी एक खेळाडू रोहित यादवने 81.56 मीटर अंतर गाठत स्पर्धेत सातवे स्थान मिळवले. त्यानेही काही चांगल्या फेकी करत अंतिम क्रमवारीत स्थान मिळवले.


या यशानंतर भारताची 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पदकसंख्या 23 वर पोहोचली आहे. भारताने आतापर्यंत 5 सुवर्ण, 12 रौप्य आणि 6 कांस्य पदके जिंकली आहेत. ॲथलेटिक्स आणि पॅरा-ॲथलेटिक्समध्ये मिळून 11 पदके मिळाली असून, ज्युडोमध्ये 3, वेटलिफ्टिंगमध्ये 8 आणि पॅरा-पॉवरलिफ्टिंगमध्ये 1 कांस्यपदक भारताने जिंकले आहे. (Javelin Throw)


सध्या पदकतालिकेत भारत 10 व्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलिया 128 पदकांसह अव्वल स्थानावर असून इंग्लंड दुसऱ्या आणि कॅनडा तिसऱ्या क्रमांकावर आहे.

Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून