Cockroach Janata Party : 'कॉक्रोच जनता पार्टी'च्या फॉरेन फंडिंगची चौकशी सुरू

- गृहराज्यमंत्री पंकज भोयर; महाराष्ट्रात गृह विभाग आणि केंद्रात ईडीकडून तपास


मुंबई : नीट पेपरफुटी प्रकरणी आंदोलन उभारणाऱ्या 'कॉक्रोच जनता पार्टी' (सीजेपी) (Cockroach Janata Party) या संघटनेला परदेशातून निधी (फॉरेन फंडिंग) मिळत असल्याच्या संशयावरून चौकशी सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणी महाराष्ट्रात राज्य गृह विभाग आणि केंद्र स्तरावर अंमलबजावणी संचालनालय (ईडी) यांच्याकडून तपास सुरू असल्याची माहिती गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली आहे. त्यामुळे ही संघटना आता राज्य व केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आल्याचे स्पष्ट झाले आहे.



दिल्लीतील जंतर-मंतर येथे ३५ दिवस चाललेल्या आंदोलनादरम्यान सीजेपीने (Cockroach Janata Party) नीट पेपरफुटी आणि तत्कालीन शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. या आंदोलनासाठी सीजेपीला परदेशातून निधी पुरवला जात असल्याचा आरोप करण्यात आला होता. या आरोपांची दखल घेत सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेत. परदेशी निधीचा वापर देश, राज्य किंवा समाजात अस्थिरता निर्माण करण्यासाठी केला जात असेल, तर अशा संस्थांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा गृहराज्यमंत्र्यांनी दिला आहे.



दरम्यान, या चौकशीवर प्रतिक्रिया देताना सीजेपीचे (Cockroach Janata Party) संस्थापक अभिजीत दिपके (Abhijit Dipke) यांनी सरकारला संशय असल्यास त्यांनी खुशाल चौकशी करावी, असे आव्हान दिले आहे. तर, परदेशी निधीचा वापर सकारात्मक कामांसाठी होत असल्यास स्वागतार्ह आहे, मात्र देशविरोधी किंवा समाजविघातक कृत्यांसाठी वापर होत असल्यास चौकशी अनिवार्य असल्याचे सांगत गृहराज्यमंत्र्यांनी इतरही संशयास्पद संस्थांचा तपास सुरू असल्याचे स्पष्ट केले.

Comments
Add Comment

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण

तडजोड नको! एअर इंडिया इमारत आणि आमदार निवासाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री शिवेंद्रसिंहराजेंचे आदेश

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक घेत प्रमुख विकासकामांचा थेट

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर