Jalgaon Crime : बहिणीच्या प्रेमविवाहाचा संताप अनावर, भावाने मेहुण्याच्या डोक्यात दगड घातला अन् पुढे... ; मेहुण्याचा मृत्यू

Jalgaon Crime News : बहिणीने कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध दुसऱ्या समाजातील तरुणाशी प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून मेहुण्यावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना जामनेर तालुक्यातील फत्तेपूर पोलीस ठाण्याच्या (Fatehpur Police Station) हद्दीत घडली होती. या हल्ल्यात प्रशांत चौधरी (२५) हा गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथे अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते मात्र उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. (Jalgaon Crime News)



नेमकं प्रकरण काय ?


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत चौधरी आणि संबंधित तरुणी हे वेगवेगळ्या समाजातील असून दोघांमध्ये काही काळापासून प्रेमसंबंध होते. कुटुंबीयांचा विरोध असल्याने त्यांनी सिल्लोड येथे जाऊन प्रेमविवाह केला. संबंधित तरुणी वडगाव सद्दो येथील आहे. विवाहानंतर दोघे एकत्र राहत असताना या नात्याबद्दल मुलीच्या कुटुंबीयांमध्ये तीव्र नाराजी होती. प्रेमविवाहामुळे कुटुंबाची बदनामी झाल्याची भावना मनात ठेवून मुलीचा सख्खा भाऊ अभिषेक मोरे याने प्रशांत चौधरी याचा काटा काढण्याचा कट रचल्याचे तपासात समोर आले आहे. (Jalgaon Crime News)



घटनेच्या दिवशी काय घडलं ?


घटनेच्या दिवशी अभिषेकने प्रशांतला विश्वासात घेत गोड बोलून तोरणाळा जंगल परिसरात नेले. तेथे दोघांनी मद्यपान केले. त्यानंतर त्याने संधी साधली आणि अभिषेकने जवळील मोठा दगड उचलून प्रशांतच्या डोक्यात घातला. या हल्ल्यात प्रशांत गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडला. तो मृत झाल्याचा समज करून संशयिताने त्याला जंगलातील एका खड्ड्यात फेकून दिले. पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याच्या अंगावर झाडांची पाने व फांद्या टाकून तो घटनास्थळावरून पसार झाला. (Jalgaon Crime News)



उपचारादरम्यान मेहुण्याच्या मृत्यू


दरम्यान, प्रशांत रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला. मात्र त्याचा कोणताही मागमूस न लागल्याने त्याची आई सरला चौधरी यांनी फत्तेपूर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. तपासादरम्यान तोरणाळा जंगल परिसरात प्रशांत अर्धमृत अवस्थेत आढळून आला. त्याला तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक होती. त्यामुळे पुढील उपचारासाठी त्याला छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनंतरही त्याची प्रकृती सुधारली नाही. अखेर शुक्रवारी उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. (Jalgaon Crime News)



खुनाचे वाढीव कलम लागू होणार


सुरुवातीला या प्रकरणी जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल (Fatehpur Police Station) करण्यात आला होता. मात्र हल्ल्यात जखमीचा मृत्यू झाल्याने आता या गुन्ह्यात भारतीय न्याय संहितेअंतर्गत खुनाचे संबंधित वाढीव कलम समाविष्ट करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून संशयिताविरुद्ध अधिक कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र प्रशांतच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण