Multiplex : स्पायडरमॅन सिनेमावर कुशल बद्रिके नाराज ; नक्की कारण काय ?

उत्तम कलाकृतींना नेहमीच अमाप प्रेम देणाऱ्या प्रेक्षकांनी मराठी चित्रपटांना नेहमीच चांगला प्रतिसाद दिला आहे. पण आजही मराठी सिनेमांना महाराष्ट्रामध्ये शो करिता मल्टिप्लेक्स मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. स्पायडरमॅन हा हॉलिवूडचा सिनेमा ३१ जुलै २०२६ रोजी मुंबईसह भारतात प्रदर्शित झाला. या सिनेमासाठी मुंबईसह महाराष्ट्रात मल्टिप्लेक्स उपलब्ध आहेत पण मराठी चित्रपटाला मल्टिप्लेक्ससाठी संघर्ष करावा लागत आहे. याबाबत अभिनेता कुशल बद्रिकेने खंत व्यक्त केली.


या निराश करणाऱ्या वातावरणातून मराठी चित्रपटसृष्टीला पुन्हा एकदा नव्याने उभारी देणारी बातमी आली आहे. एका वर्षामध्ये दोन मराठी सिनेमांनी १०० कोटींचा टप्पा पार केला आहे. सामाजिक, ऐतिहासिक आणि पौराणिक विषयांवरील सिनेमांना मराठी प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. तसेच हॉरर, थ्रिलर आणि विनोदी सिनेमांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे मराठी चित्रपटसृष्टी नव्या उंचीवर पोहोचताना दिसत आहे.



एकाच वर्षामध्ये रितेश देशमुख यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘राजा शिवाजी’ आणि प्रवीण तरडे यांनी दिग्दर्शित केलेला ‘देऊळ बंद २’ या सिनेमांनी १०० कोटींचा टप्पा पार केला. मराठी प्रेक्षकांनी या सिनेमांना उदंड प्रतिसाद दिला, अगदी महिना उलटून गेल्यानंतरही सिनेमांचे हे शो हाऊसफुल्ल होत होते. मात्र मराठी सिनेमांसाठी शो मिळविण्याकरिता थिएटर मिळत नसल्याची खंत कुशल बद्रिकेने व्यक्त केली आहे.


मराठी चित्रपटांना मल्टिप्लेक्स मिळत नाही:


सध्या कुशल बद्रिके हा त्याच्या ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ सिनेमामुळे चर्चेमध्ये आला आहे. कुशलसह सिनेमाची संपूर्ण टीम जोरदार प्रमोशन करीत आहे. सिनेमाची निर्मिती आणि त्याच्या प्रमोशनसाठी टीमकडून अथक प्रयत्न केले जात असूनही चित्रपटगृहांमध्ये मात्र शो मिळत नसल्याची खंत कुशल बद्रिकेने व्यक्त केली आहे.



काय म्हणाला कुशल बद्रिके?


“सिनेमा बघण्यासाठी प्रेक्षकांना ठिकाणच नसतं हे काही मला पटत नाही. हॉलीवूडच्या सिनेमांसाठी ७५० ते १५०० रुपये तिकिटांचा दर लावतात. आणि आम्हाला शोसुद्धा देत नाही. कितीतरी लोकांनी मला अशा प्रकारची समस्या सांगणारे मेसेज केले आहेत. ‘आम्हाला तिकीट बुक करायचं आहे पण शोच दाखवत नाहीये,’ असे प्रेक्षक सांगत असतात,” अशी खंत कुशल बद्रिकेने व्यक्त केली आहे.

Comments
Add Comment

Kashmira Irani Pregnancy : अभिनेत्री कश्मिरा इराणीने दिली गुडन्यूज! ४०व्या वर्षी होणार आई; लग्नानंतर दोन वर्षांनी घरात येणार चिमुकला पाहुणा

मुंबई : बॉलिवूड आणि टेलिव्हिजन विश्वातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. लोकप्रिय अभिनेत्री कश्मिरा इराणी लवकरच

Mirzapur: The Movie : रिलीजपूर्वीच ‘मिर्झापूर: द मूव्ही’ चर्चेत; तब्बल ३ तास १७ मिनिटांचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

मुंबई : प्राइम व्हिडिओची गाजलेली मालिका 'मिर्झापूर' आता 'मिर्झापूर द मूव्ही' या नावाने मोठ्या पडद्यावर प्रदर्शित

Samay Raina : इंडियाज गॉट लेटेंट २' मध्ये नक्की काय घडलं? 'त्या' विनोदावरून समय रैनावर भाजपचे आमदार संतापले

मुंबई : स्टॅन्डअप कॉमेडियन समय रैना पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ‘इंडियाज गॉट लेटंट’च्या नुकत्याच

Imran Hashmi : अभिनेता इम्रान हाश्मीला H1N1ची लागण; प्रकृती बिघडल्याने बंगळुरूचा कार्यक्रमही पुढे ढकलला

मुंबई : अभिनेता इम्रान हाश्मीला स्वाइन फ्लू अर्थात H1N1 विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. शूटिंगच्या

Thug Sukesh Chandrasekhar : सुकेश चंद्रशेखरचे नोरा फतेहीला धमकीवजा पत्र व्हायरल; जॅकलिनबाबत मोठा दावा करत पुरावे सार्वजनिक करण्याची धमकी

२०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील मुख्य आरोपी आणि कारागृहात असलेला ठग सुकेश

Manoj Bajpayee : अभिनेता मनोज बाजपेयीनं महाराष्ट्रात कुठे आणि किती जमीन खरेदी केली ?

मुंबई : मुंबई का किंग कौन भिक्खू म्हात्रे या सत्या चित्रपटातील डायलॉगमुळे १९९८ मध्ये अभिनेता मनोज बाजपेयी