Siddhivinayak Temple : सिद्धिविनायक मंदिरात आर्थिक गैरव्यवहार नाही, अध्यक्ष सदा सरवणकरांनी दिली माहिती

सिद्धिविनायक मंदिरातून दर्शनासाठी पैसे घेणारे ९ कर्मचारी बडतर्फ


मुंबई : श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर (Siddhivinayak Temple) न्यासामध्ये कोणताही आर्थिक गैरव्यवहार किंवा घोटाळा झालेला नाही, असा खुलासा न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी केला आहे. काही विश्वस्तांनी सरकारला दिलेल्या पत्रामुळे नागरिकांमध्ये गैरसमज पसरला असून, मंदिर न्यासाचा कारभार अत्यंत पारदर्शक आणि उत्कृष्ट पद्धतीने सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, भाविकांकडून दर्शनासाठी ऑनलाईन माध्यमातून पैसे घेणाऱ्या ९ कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.



सिद्धिविनायक मंदिरात दरवर्षी १८ कोटी रुपयांचा घोटाळा होत असल्याचा आरोप मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी विश्वस्तांच्या पत्राचा हवाला देत केला होता. यावर भाष्य करताना सरवणकर यांनी पत्रात चोरी किंवा घोटाळ्याचा कुठेही उल्लेख नसल्याचे सांगत सर्व आरोप फेटाळून लावले. मंदिर परिसरात राबवलेल्या विविध उपाययोजनांमुळे दानपेटीतील उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे. पूर्वी दानपेटीत दरमहा ४० ते ४५ लाख जमा होत असत, मात्र गेल्या महिन्यात हे दान ९० ते ९८ लाख रुपयांपर्यंत पोहोचल्याचे त्यांनी आकडेवारीसह स्पष्ट केले.



दर्शनासाठी गैरप्रकार करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आल्याचे सांगताना सरवणकर म्हणाले की, कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून 'जीपे'द्वारे दर्शनासाठी पैसे घेतले जात असल्याचे लक्षात आल्यावर तातडीने १९ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. तपासाअंती ९ कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय, भटजींना भाविकांनी दिलेल्या दक्षिणेबाबत शासकीय नियमावली असून, ती रक्कम दानपेटीतच जमा करणे बंधनकारक असल्याचे त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण