Amit Satam : एकही आमदार-खासदार नसलेल्या राज ठाकरेंच्या मेंदूचे फूटप्रिंट काढण्याची गरज

अमित साटम; शिवउद्योग स्थापन करून किती मराठी तरुणांना उद्योगधंदे दिले?



मुंबई : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मेंदूवरील फिंगरप्रिंट तपासण्याची भाषा करणाऱ्या मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या पक्षाकडे एकही आमदार किंवा खासदार नाही. मुंबई पालिकेत केवळ सहा नगरसेवक निवडून आलेल्या राज ठाकरेंच्या स्वतःच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढण्याची आवश्यकता आहे, असा पलटवार मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी शनिवारी केला. विद्यार्थी आंदोलनावरून भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणाऱ्या राज ठाकरेंचा समाचार घेताना साटम यांनी त्यांना 'स्टँडअप कॉमेडियन'ची उपमा दिली.


मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना साटम म्हणाले, 'शिवउद्योग'च्या माध्यमातून किती मराठी तरुणांना प्रत्यक्षात उद्योगधंदे मिळवून दिले, याचे उत्तर राज ठाकरेंकडे नाही. स्वतःच्या कामगिरीबद्दल काही न बोलता ते फक्त अभिनय करत टीका करतात. केंद्र सरकारने स्टार्टअप इंडिया आणि कौशल्य विकासाच्या अनेक योजना राबवून देशाची अर्थव्यवस्था जगात चौथ्या क्रमांकावर आणली आहे, त्यामुळे फालतू वक्तव्ये करण्यापेक्षा राज ठाकरेंनी गुणवत्तेवर चर्चा करावी, असे आव्हान साटम यांनी दिले.



या वेळी साटम यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे ९० टक्के आमदारांचा विश्वास गमावून बसले. त्यामुळे त्यांचे पद, पक्ष आणि चिन्ह गेले. आता त्यांच्याकडे रोज टीका करण्याशिवाय काही उरलेले नाही. राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे कोणत्याही मुद्द्यावर बोलण्यासाठी ठोस तथ्ये उरलेली नसून, मिश्किल विधाने करून राजकारण चालवण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका साटम यांनी केली.

Comments
Add Comment

Viral Video : धावत्या बाईकवर उभे राहून तरुणाचा धोकादायक स्टंट; व्हिडीओ व्हायरल, सारण पोलिसांकडून FIR दाखल

Viral Video : सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी काही जण सार्वजनिक रस्त्यांवर धोकादायक स्टंट करत असल्याचे प्रकार

Gmail Storage : Google Photos आणि Gmail चे स्टोरेज फुल झाले? एकही रुपया खर्च न करता अशी रिकामी करा जागा

Gmail Storage: प्रत्येक Google अकाउंटसोबत 15 GB मोफत स्टोरेज मिळते. मात्र, हे स्टोरेज Google Drive, Google Photos आणि Gmail या तिन्ही सेवांसाठी

Bhuvan Bam : भुवन बामच्या अडचणी वाढल्या! गुजरातमधील विद्यापीठातील कार्यक्रमात अश्लील कृती केल्याचा आरोप; गुन्हा दाखल

Bhuvan Bam: प्रसिद्ध यूट्यूबर आणि कॉमेडियन भुवन बाम एका नव्या वादात अडकला आहे. गुजरातमधील वडोदरा येथील पारुल

BMC Health Policy : शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य योजनांचा लाभ, नागरी आरोग्य धोरणाचा मसुदा सार्वजनिक आरोग्य समितीसमोर सादर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) BMC Health Policy : निरोगी मुंबई आणि भविष्यकालीन सज्जतेसाठी मुंबई महानगरपालिकेने नागरी आरोग्य

Mumbai Pune Expressway : प्रवाशांसाठी खुशखबर! अटल सेतू आणि मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे लवकरच जोडले जाणार, 67 टक्के काम पूर्ण

Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ आणखी कमी होण्याची शक्यता आहे. अटल सेतूला थेट मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाशी

Jharkhand Accident News: पत्नीच्या शिक्षकपदी निवडीचा आनंद ठरला अखेरचा प्रवास; भीषण अपघातात 13 जणांचा मृत्यू

Jharkhand Accident News: पत्नीची शिक्षकपदी निवड झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी मंदिरात निघालेल्या एका कुटुंबावर काळाने घाला