Commonwealth Games 2026 : भीषण अपघातात पाय गमावला, पण जिद्द नाही! सुवर्ण-रौप्य दुहेरी पराक्रम गाजवला

 शुभम जुयालची राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रौप्यपदकाची ऐतिहासिक कमाई


ग्लास्गो येथे पार पडलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ मधील पॅरा-ॲथलेटिक्स प्रकारात भारताच्या खेळाडूंनी अद्भूत पराक्रम गाजवला आहे. पुरुषांच्या शॉटपुट एफ-५७ (F57) या प्रकारात भारतीय खेळाडू शुभम जुयाल याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत रौप्यपदक आपल्या नावे केले. एकेकाळी लष्करी अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या आणि एका भीषण अपघातात आपला एक पाय गमावणाऱ्या शुभमचा हा विजय केवळ एका पदकाचा नसून, त्याच्या अफाट इच्छाशक्तीचा आणि जिद्दीचा पुरावा आहे.


सैन्यात भरती होण्याचे स्वप्न : 


उत्तराखंडमधील रुरकी येथे जन्मलेल्या शुभम जुयालची कहाणी ही प्रत्येकाला प्रेरणा देणारी आहे.  शुभमचे वडील भारतीय सैन्यात नायब सुभेदार पदावरून निवृत्त झाले होते. त्यामुळे लहानपणापासूनच सैन्यात भरती होऊन देशसेवा करण्याचे आणि वडिलांचा वारसा अभिमानाने पुढे चालवण्याचे शुभमचे स्वप्न होते. २०२२ मध्ये शुभमने 'एसीसी'ची (ACC) लेखी परीक्षा उत्तीर्ण केली होती. त्यानंतर सैन्यदलात 'सर्व्हिस एंट्री स्कीम' अंतर्गत अधिकारी होण्यासाठी तो एसएसबी (SSB) मुलाखतीची तयारी करत होता. मुलाखतीच्या दिवशीच बाइकवरून जात असताना शुभमचा भीषण अपघात झाला. अवघ्या २६ वर्षांच्या तरुण वयात या अपघाताने त्याचे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकले.
या अपघातात डॉक्टरांना त्याचा एक पाय कापावा लागला. त्यामुळे त्याची लष्करातील नोकरीची आणि अधिकारी बनण्याची स्वप्ने क्षणात धुळीस मिळाली.


आयुष्याला मिळाली नवी दिशा :


रुग्णालयाच्या पलंगावर पडून असताना मानवी आयुष्यातील अनिश्चिततेची जाणीव शुभमने करून घेतली. खचून न जाता त्याने वर्तमानात जगण्याचा निश्चय केला. २०२३ मध्ये त्याला पुण्यातील 'आर्टिफिशियल लिंब सेंटर'मध्ये पाठवण्यात आले. तिथे त्याला नोकरीसाठी डिप्लोमा कोर्स करणे किंवा पॅरा-स्पोर्ट्समध्ये करिअर करणे असे दोन पर्याय देण्यात आले. स्वतःला सिद्ध करण्याच्या तीव्र इच्छेने प्रेरित होऊन शुभमने पॅरा-स्पोर्ट्सची निवड केली.
इथे त्याला आधीच पदके जिंकलेल्या दोन वेळच्या ऑलिम्पियन सुभेदार सोमन राणा यांचे मार्गदर्शन आणि प्रेरणा मिळाली. अनुभवी खेळाडूंसोबत घेतलेल्या कठोर प्रशिक्षणामुळे शुभमचा आत्मविश्वास कमालीचा वाढला आणि त्याच्या क्रीडा प्रवासाला एक नवी दिशा मिळाली.


अंतिम फेरीत चमकदार कामगिरी आणि सुवर्ण-रौप्यची दुहेरी ऐतिहासिक प्राप्ती :


राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पुरुषांच्या शॉटपुट एफ-५७ (F57) प्रकारात भारताने वर्चस्व गाजवले.  याच प्रकारात सोमन राणा यांनी १३.४० मीटर थ्रो करत भारतासाठी सुवर्णपदक जिंकले. तर, शुभम जुयाल याने आपल्या सहाव्या आणि अंतिम प्रयत्नात १३.२८ मीटरचा सर्वोत्तम थ्रो करत रौप्यपदक पटकावले. शुभमने अंतिम फेरीत कमालीचे सातत्य दाखवले. त्याने १३.०८ मीटरने सुरुवात केली होती, त्यानंतर १२.४२ मीटर, १३.२७ मीटर, १३.१६ मीटर आणि १२.८८ मीटर थ्रो केले. अखेर १३.२८ मीटरच्या सर्वोत्तम कामगिरीसह त्याने रौप्यपदकावर शिक्कामोर्तब केले.


या प्रकारात भारताला मिळालेले हे पहिलेच सुवर्णपदक असून, भारताची ही या प्रकारातील पहिलीच ऐतिहासिक दुहेरी (सुवर्ण आणि रौप्य) पदकप्राप्ती ठरली आहे. अपघाताने शरीर हिरावले असले तरी आत्मविश्वासाच्या बळावर जगात क्रांती घडवता येते, हेच शुभम जुयाल याने आपल्या कामगिरीने सिद्ध करून दाखवले आहे.
Comments
Add Comment

Tiwana Football Club : वांद्र्यातील नेव्हिल डि'सूजा फुटबॉल मैदानावर तिवाना संघाची बाजी

- मुंबई फुटबॉल असोसिएशन फर्स्ट डिव्हिजन २०२६ च्या चषकावर कोरले नाव मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई फुटबॉल

India vs Thailand Women T20 Asia Cup 2026 : भारताचा थायलंडवर ९४ धावांनी दणदणीत विजय; शेफाली वर्माची तुफानी खेळी

दुबई : महिला टी-२० आशिया कप २०२६च्या सलामीच्या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने थायलंडचा ९४ धावांनी पराभव

ENG vs PAK Test Match : लॉर्ड्सवर पाकिस्तानचा ‘काळा दिवस’; १९४ धावांत ऑलआऊट, WTC फायनलच्या शर्यतीतून बाहेर!

लॉर्ड्स : इंग्लंडविरुद्धच्या लॉर्ड्स कसोटीत पाकिस्तानला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. ३८९ धावांच्या

Kagiso Rabada : कागिसो रबाडा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकण्याची शक्यता

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेच्या सुरुवातीपूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे.

Roger Federer : रॉजर फेडररचा 'टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश

नवी दिल्ली : ऱ्होड आयलंडमधील न्यूपोर्ट येथे 'इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश होताना २० वेळा ग्रँडस्लॅम

Dwayne Bravo No. 47 retired : ट्रिनबागो नाइट रायडर्सकडून ड्वेन ब्राव्होची ४७ क्रमांकाची जर्सी निवृत्त

नवी दिल्ली : ट्रिनबागो नाइट रायडर्स (टीकेआर) संघाने ड्वेन ब्राव्होची प्रतिष्ठित ४७ क्रमांकाची जर्सी निवृत्त