Hardik Pandya : हार्दिक पांड्यानं घेतला मोठा निर्णय, महिकासोबत घेतलं तिरुपतीच्या बालाजीचं दर्शन

तिरुपती : दुखापतीमुळे भारतीय संघाबाहेर असलेला क्रिकेटपटू हार्दिक पांड्या सध्या चर्चेत आहे. अष्टपैलू हार्दिकने त्याची मैत्रीण महिका शर्मासोबत आंध्र प्रदेशमधील तिरुपती बालाजीचं अर्थात भगवान व्यंकटेश्वराचं दर्शन घेतलं. मंदिराच्या आवारात असतानाच क्रिकेटपटू हार्दिक पांड्यानं एक मोठा निर्णय घेतला. त्यानं केशदान करण्याचा निर्णय घेतला. डोक्यावरचे सगळे केस दान केले.



व्हायरल होत असलेल्या फोटो आणि व्हिडीओंमध्ये क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि त्याची मैत्रीण महिका शर्मा एकमेकांसोबत दिसत आहेत. हार्दिकनं पांढऱ्या रंगाचा कुर्ता - पायजमा परिधान केला आहे. हार्दिकनं पूर्ण टक्कल केल्याचंही दिसत आहे. मंदिरात असतानाच हार्दिकने डोक्यावरचे सगळे केस दान केले. हार्दिक आणि महिकाने सुप्रभातम सेवेत भाग घेतला आणि भगवान व्यंकटेश्वराचा आशीर्वाद घेतला.



भारताचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पांड्या दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. तो संघात पुनरागमन करण्यासाठी संघर्ष करत आहे. जेव्हा हार्दिक दर्शनासाठी तिरुमला येथील भगवान व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात पोहोचला, तेव्हा त्याने पांढरा कुर्ता-पायजमा घातला होता. तसेच त्याने डोक्यावरचे सगळे केस दान केले होते. त्याच्या कपाळावर टिळाही लावला होता. त्याची प्रेयसी महिका शर्मा देखील हार्दिकसोबत होती, त्या दोघांनी मंदिरात जाऊन भगवान व्यंकटेश्वर स्वामींना प्रार्थना केली.



भारतीय संघाने २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी तयारी सुरू केली आहे. या तयारीत हार्दिक एक महत्त्वाचा खेळाडू आहे. फिटनेस चाचणी उत्तीर्ण झाल्यास तो सप्टेंबर २०२६ पासून पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना दिसण्याची शक्यता आहे. तो ०२५ च्या सुरुवातीला चॅम्पियन्स ट्रॉफीत न्यूझीलंड विरुद्ध खेळला होता. हाच त्याचा अंतिम एकदिवसीय सामना होता. या व्यतितिरित्त हार्दिक २०२६ च्या टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात खेळला होता. पण मागील काही दिवसांपासून दुखापतीमुळे तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. आता तिरुपती बालाजीच्या दर्शनाच्या निमित्ताने तो नव्याने चर्चेत आला आहे.





हार्दिक पांड्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कामगिरी



  • ११ कसोटी सामने - ५३२ धावा - एक शतक आणि चार अर्धशतके - एका डावात केलेल्या १०८ धावा ही सर्वोत्तम धावसंख्या - घेतले १७ बळी

  • ९४ एकदिवसीय सामने - १९०४ धावा - ११ अर्धशतके - नाबाद ९२ धावा ही सर्वोत्तम धावसंख्या - घेतले ९१ बळी

  • १३१ टी ट्वेंटी सामने - २१२८ धावा - ८ अर्धशतके - नाबाद ७१ ही सर्वोत्तम धावसंख्या - घेतले १०७ बळी

Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून