Maharashtra Freedom of Religion Bill : महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी, आता आंतरधर्मीय विवाह झाल्यास अपत्याला आईचा धर्म मिळणार

मुंबई : सक्तीने किंवा फसवून केल्या जाणाऱ्या धर्मांतराला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र शासनाने तयार केलेल्या महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी मिळाली आहे. यामुळे महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू होणार आहे. या कायद्यानुसार राज्यात बळजबरीने किंवा आमिष दाखवून धर्मांतर करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल.



नव्या कायद्यानुसार राज्यात कोणत्याही व्यक्तीचे बळजबरीने, धमकावून, फसवून किंवा आमिष दाखवून धर्मांतर करणे हा गंभीर आणि अजामीनपात्र गुन्हा आहे. दोषी आढळल्यास सात वर्षांपर्यंतच्या कठोर कारावासाची शिक्षा आणि एक लाखापर्यंतच्या दंडाची तरतूद कायद्यात आहे.



जर एखाद्याला स्वेच्छेने धर्मांतर करायचे असेल तर त्यासाठी कायद्यात विशेष नियमाची तरतूद आहे. स्वेच्छेने धर्मांतर करू इच्छिणाऱ्या व्यक्तीला ६० दिवस (२ महिने) आधी सक्षम प्राधिकरणाकडे लेखी अर्ज सादर करावा लागणार आहे. प्राधिकरणाकडून कायदेशीर पडताळणी आणि मंजुरी मिळाल्यानंतरच संबंधित व्यक्तीला धर्मांतर करता येईल. नव्या कायद्यातील तरतुदीनुसार आंतरधर्मीय विवाह झाल्यास, दांपत्याच्या अपत्याला आईचा विवाहापूर्वीचा धर्म मिळणार आहे.

Comments
Add Comment

Hindi Exam : सरकारी कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा शिकण्याची सक्ती करणारा निर्णय रद्द

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या भाषा संचालनालयामार्फत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आयोजित करण्यात येणारी ‘हिंदी भाषा

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षतेत सप्टेंबरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यव्यापी शिबीर

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे एक दिवसीय राज्यव्यापी शिबिर २७ सप्टेंबर रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात आल्याची

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् इराणचे अध्यक्ष पेझेश्कियान यांची भेट

नवी दिल्ली : अमेरिका आणि इराणमधील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दोन्ही

Lionel Messi : मेस्सीचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा

अर्जेंटिना : अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली