Commonwealth Games 2026 : प्रिया घंगासची अद्भुत कामगिरी! कॅनेडियन बॉक्सरचा पराभव करत जिंकले सुवर्णपदक

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारतीय बॉक्सिंगपटूंनी आपली सुवर्ण घोडदौड कायम ठेवली आहे.


महिलांच्या ६० किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात भारताची युवा बॉक्सर प्रिया घंगास हिने अत्यंत प्रभावी कामगिरी करत कॅनडाच्या मेरी अल-अहमदियेह हिचा पराभव केला आणि भारतासाठी सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.


१ ऑगस्ट २०२६ रोजी खेळल्या गेलेल्या या अंतिम सामन्याची सुरुवात प्रियासाठी आव्हानात्मक होती.



  •  पहिल्या फेरीत कॅनडाच्या मेरी अल-अहमदियेह हिने ३-२ अशी निसटती आघाडी घेतली होती.

  • परंतु, दुसऱ्या फेरीत प्रियाने आपल्या खेळाची लय सापडत आक्रमक चाली रचल्या आणि ही फेरी ४-१ च्या फरकाने जिंकली.

  • तिसऱ्या आणि निर्णायक फेरीतही प्रियाने हेच वर्चस्व कायम ठेवत ४-१ अशा समान निर्णयाने विजय मिळवला.


पहिल्या फेरीतील विजयानंतरच तिने मोकळा श्वास घेतला.




'गोल्डन गर्ल' आणि 'मिनी क्यूबा भिवानी' :


हरियाणातील भिवानी जिल्ह्यातील धनना या छोट्याशा गावची रहिवासी असलेली २० वर्षीय प्रिया घंगास आज देशाची नवी क्रीडा स्टार बनली आहे. तिचे कुटुंब मध्यमवर्गीय असून, तिचे वडील महेंद्र घंगास हे व्यावसायिक आहेत आणि आई गृहिणी आहे. तिला एक भाऊ आणि एक बहीण आहे. तिच्या भावाचे नाव नीरज असून तोसुद्धा बॉक्सिंगमध्येच आपले भवितव्य घडवण्याचे स्वप्न पाहत आहे.
तिच्या या शानदार कामगिरीमुळे क्रीडा रसिकांनी तिला "गोल्डन गर्ल" आणि "मिनी क्यूबा भिवानीची नवी मुलगी" अशी टोपणनावे दिली आहेत.




कुस्तीची आवड आणि बॉक्सिंगमधील सुवर्णमय प्रवास : 


प्रियाच्या बॉक्सिंग कारकिर्दीची कहाणी अतिशय मनोरंजक आहे. लहानपणी प्रियाला बॉक्सिंगपेक्षा कुस्ती या खेळात जास्त रस होता. परंतु, २००८ मध्ये भारतीय बॉक्सर विजेंदर सिंग यांनी ऑलिम्पिकमध्ये मिळवलेले ऐतिहासिक यश पाहून ती प्रेरित झाली आणि तिने बॉक्सिंगमध्ये करिअर करण्याचा पक्का निश्चय केला.
त्यानंतर २०१६ पासून तिने अधिकृतपणे बॉक्सिंगच्या रिंगमध्ये पाऊल ठेवले आणि कठोर परिश्रमांच्या जोरावर प्रगती करत गेली. अवघ्या २० वर्षे वय असलेल्या प्रियाने जागतिक स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करत देशाची मान अभिमानाने उंचावली आहे. येत्या काळातही ती अशीच चमकदार कामगिरी करत देशाल गौरव मिळवून देईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Comments
Add Comment

India vs New Zealand Test : टीम इंडियाला मोठा धक्का ! आकाशदीप दुसऱ्या कसोटीतून बाहेर, प्रसिद्ध कृष्णाला मिळाली संधी

India vs New Zealand Test : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी सामन्यादरम्यान टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज

Ind Vs Nz: भारताचा दुसऱ्या कसोटीचा पहिला डाव 246 धावांवर आटोपला, ध्रुव जुरेलची झुंजार खेळी

मुंबई: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दुसरा कसोटी सामना क्राइस्टचर्चच्या हॅगले ओव्हल मैदानात सुरू आहे. या सामन्यात

न्यूझीलंडसमोर टीम इंडियाची घसरगुंडी! 240 धावांची अजूनही पिछाडी

क्राइस्टचर्च : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाची फलंदाजी दुसऱ्या दिवशी

आकाशदीपचा क्राइस्टचर्चमध्ये 'पंजा'; न्यूझीलंडचा पहिला डाव 356 धावांत आटोपला, ब्लंडेलचे शतक हुकले...

मुंबई: क्राईस्टचर्चमधील हेगले ओव्हल मैदानावर सुरू असलेल्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी

'हिटमॅन'चा नंबर गेम! संध्याकाळी 17:45 वाजताच मुंबई इंडियन्सने का केली रोहित शर्माच्या नावाची घोषणा? जाणून घ्या

मुंबई इंडियन्स आयपीएल 2027 स्पर्धेसाठी सज्ज झाली आहे. मिनी लिलावापूर्वी नव्या कर्णधाराची घोषणा केली आहे. हा

Rohit Sharma : 'चला, सगळ्यांनी छान हसा..', मुंबई इंडियन्सचा कर्णधार होतात रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया Video

IPL 2027 Mumbai Indians Captain Name : रोहित शर्मा पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी विराजमान झाला आहे. मागच्या तीन पर्वात