Maharashtra Karjmafi 2026 : ४ ऑगस्टला शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे ७ हजार कोटी जमा होणार

मुंबई : राज्य सरकारच्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' अंतर्गत पात्र ठरलेल्या सुमारे १६ लाख ९४ हजार शेतकऱ्यांच्या पीक कर्ज खात्यात मंगळवारी, ४ ऑगस्ट रोजी एकाच वेळी सात हजार कोटी रुपये जमा केले जाणार आहेत. सहकार विभागाच्या या निर्णयामुळे थकीत कर्जदारांना मोठा दिलासा मिळणार असून त्यांचा पुन्हा नवीन पीक कर्ज घेण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.



राज्य सरकारने ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत पीक कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांच्या मर्यादेत कर्जमाफी जाहीर केली आहे. या योजनेनुसार पहिल्या टप्प्यात दोन लाखांच्या आतील कर्जदार शेतकऱ्यांची यादी प्राप्तिकर विभागाकडे छाननीसाठी पाठवण्यात आली होती. यामध्ये प्राप्तिकर भरणारे ९४ हजार शेतकरी आढळून आल्याने त्यांना कर्जमाफीसाठी अपात्र ठरवण्यात आले आहे. तर उर्वरित १६ लाख ९४ हजार पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली असून, या शेतकऱ्यांच्या कर्ज खात्याचे आधार प्रमाणीकरण पूर्ण होताच रक्कम वर्ग करण्यात येत आहे.


या योजनेअंतर्गत नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन निधी देण्यात येत आहे. तसेच दोन लाखांपेक्षा अधिक कर्ज थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांनी दोन लाखांवरील उर्वरित रक्कम बँकेत भरल्यानंतर, 'एकवेळ समझोता' (वन टाईम सेटलमेंट) योजनेअंतर्गत त्यांच्या खात्यातही सरकार २ लाख रुपये जमा करणार आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी पात्र शेतकऱ्यांनी काळजी करू नये असे सांगत, या प्रक्रियेमुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी

मसाल्यांमध्ये कृत्रिम रंग आणि भेसळीला बंदी; उत्पादक, विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिकांनाही नियम बंधनकारक

मुंबई : मसाल्यांमधील भेसळ रोखून ग्राहकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने

राज्यातील १०२ आणि १०८ रुग्णवाहिका सेवांचे होणार एकत्रीकरण - वर्ष अखेरीस ४ हजार ५०० नव्या रुग्णवाहिका

मुंबई : राज्यातील आपत्कालीन आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि वेगवान करण्यासाठी १०२ आणि १०८ या रुग्णवाहिका सेवांचे

Pratap Sarnaik : एसटीचा १५ टक्के हंगामी भाडेवाढीचा प्रस्ताव नामंजूर, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना दिलासा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा निर्णय

मुंबई : दुष्काळ आणि महागाईमुळे आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा देण्यासाठी एसटी