Kolhapur : आरोपी फरार; कोल्हापुरातील बाळूमामांच्या मंदिरात ६० कोटींचा घोटाळा

महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कोल्हापूरच्या प्रसिद्ध संत बाळूमामा मंदिरात तब्बल ६० कोटी ७५ लाख रुपयांचा आर्थिक घोटाळा झाल्याचा गुन्हा पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला आहे. राज्यातील मंदिरांमधील हा सर्वात मोठा गैरव्यवहार असल्याची चर्चा आहे.


आर्थिक घोटाळा प्रकरणी उपनिबंधक रागिणी (रोहिणी) खडके यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल होऊनही खडके अद्याप फरार असल्याने पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. तक्रारदार अरुण हत्ती आणि प्रवीण पाटील यांनी तत्कालीन सहाय्यक धर्मादाय आयुक्त निवेदिता पवार यांच्यावर या संपूर्ण घोटाळ्याचे सूत्रधार असल्याचा आरोप केला आहे.



घोटाळ्यातील ६ गंभीर आरोप :




  • जमीन व्यवहारातील अपहार : अवघ्या २० लाखांची जमीन दुरुस्ती दस्ताद्वारे थेट ३ कोटी रुपयांना दाखवून निधी लाटला.

  • २३ जमिनींच्या नोंदींत तफावत : देवस्थानाच्या २३ जमिनींची मालकी आणि कागदपत्रांमध्ये मोठे घोळ आढळले आहेत.

  • देणगीचा हिशोब गायब : दानपेटी, पशुधन विक्री व इतर मार्गाने येणाऱ्या कोट्यवधींच्या देणगीचा कोणताही अधिकृत हिशोब नाही.

  • सोन्याचांदीचे दागिने गहाळ : भाविकांनी अर्पण केलेल्या सोन्याचांदीच्या दागिन्यांचे वजन, नोंद व विक्रीची माहिती गहाळ आहे.

  • दोन वेगवेगळ्या नोंदवह्या : उत्पन्न आणि खर्च वेगळा दाखवून आर्थिक फेरफार करण्यासाठी दोन स्वतंत्र नोंदवह्या वापरल्या गेल्या.

  • बनावट कागदपत्रे : एफआयआरनुसार (FIR) बनावट कागदपत्रे तयार करणे, विश्वासघात आणि पुराव्यांत फेरफार केल्याचे स्पष्ट झाले आहे.

Comments
Add Comment

Cotton Rate : कापसाच्या दरात तेजीचे संकेत ! भाव 10 हजारांचा टप्पा ओलांडणार? शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या

Cotton Rate : राज्यात यंदा कापूस उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एल निनोचा प्रभाव, पावसातील मोठे

Maharashtra Weather Update: मुंबई-ठाण्यात उष्णतेचा इशारा; कोकणासह देशातील अनेक भागांत पावसाची शक्यता

Maharashtra Weather Update: देशातून नैऋत्य मान्सूनने पूर्णपणे माघार घेतली असली, तरी देशातील हवामानातील बदल सुरूच आहेत. बंगालचा

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि