Chandrashekhar Bawankule : चंद्रकांतदादा पाटील हे संस्कारमय आणि आदर्श व्यक्तिमत्त्व, त्यांच्यावरील टीका समाज मान्य करणार नाही; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

सिंधुदुर्ग : "चंद्रकांतदादा पाटील हे खऱ्या अर्थाने संस्कारमय आणि आदर्श व्यक्तिमत्त्व असून त्यांनी आयुष्यभर समाजातील शेवटच्या घटकाच्या कल्याणासाठी कार्य केले आहे. त्यांच्यावर अशा प्रकारची टीका करणे समाज कधीही मान्य करणार नाही," असा घणाघात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज केला.



मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केलेल्या विधानावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी टीका केली होती. या टीकेला महसूल मंत्री बावनकुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.



सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी वडेट्टीवार यांच्या टीकेचा खरपूस समाचार घेतला आणि चंद्रकांतदादा पाटील यांचे खंबीरपणे समर्थन केले.


महसूल मंत्री बावनकुळे पुढे म्हणाले की, "चंद्रकांतदादा पाटील हे आमच्यासारख्या हजारो कार्यकर्त्यांसाठी प्रेरणेचा स्रोत आहेत. विद्यार्थी दशेपासून त्यांनी धर्म, संस्कृती, देव आणि देशासाठी स्वतःला समर्पित केले आहे. अशा ज्येष्ठ आणि निष्ठावंत नेतृत्वावर टीका करून विरोधक आपली पातळी घसरवत आहेत. कोणताही सुजाण नागरिक किंवा समाज अशा प्रकारची टिप्पणी स्वीकारणार नाही." विरोधकांनी मुद्द्यांची मांडणी सोडून वैयक्तिक पातळीवर येऊन टीका करणे थांबवावे, असा सल्लाही यावेळी महसूल मंत्र्यांनी दिला.

Comments
Add Comment

Kylian Mbappe : मेस्सीचा विक्रम मोडला! चॅम्पियन्स लीगमध्ये 100 सामने खेळणारा सर्वात तरुण खेळाडू

Kylian Mbappe : फुटबॉल विश्वातून एक अत्यंत रोमांचक आणि अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. रिअल मद्रिदचा स्टार फॉरवर्ड किलियन

Gold Rate Today : आनंदाची बातमी ! सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीचे भावही उतरले

Gold Rate Today : सोन्या-चांदीच्या दरात गुरुवार, 15 ऑक्टोबर रोजी मोठी घसरण पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून

Durga Puja 2026 : नवरात्रीचा उत्साह अन् दुर्गेचा जागर! जाणून घ्या दुर्गापूजेचे संपूर्ण वेळापत्रक, धार्मिक महत्त्व आणि मुख्य विधी

हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि मुख्य सणांपैकी एक असलेल्या दुर्गापूजा (Durga Puja) उत्सवाला सुरुवात होत आहे. वाईटावर

‘पुन्हा नक्की भेटू’ २३ ऑक्टोबरला रंगभूमीवर; नाटकाच्या निमित्ताने मुक्ता आणि मीरा यांची नाट्यक्षेत्रात नवी भरारी

काही नाती काळाच्या ओघात अधिक घट्ट होतात, तर काही नाती नव्या सर्जनशील वाटा खुल्या करतात ज्या नवरात्रीत देवीच्या

IND vs WI: हैदराबाद टी20 पराभवातून टीम इंडियाने घेतला धडा, पुढचा सामना कसा जिंकणार ते श्रेयस अय्यरने सांगितलं

भारतीय संघाला टी20 मालिकेतील वेस्ट इंडिजविरुद्धचा पेपर थोडा कठीण गेला आहे. पहिल्या सामन्यात भारताने विजय मिळवला

Nashik Crime : बसस्थानकातील चोऱ्यांचा पर्दाफाश ! 24 लाख 43 हजारांचा सोन्याचा मुद्देमाल जप्त ; आंतरराज्यीय टोळी जेरबंद

Nashik Crime : नाशिक शहरातील बसस्थानक परिसरात चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला गुन्हेशाखा युनिट क्रमांक १च्या पथकाने