Chandrashekhar Bawankule : आमचा 'शेर' महाराष्ट्रात प्रचंड ताकद निर्माण करतोय!

- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून मंत्री नितेश राणे यांच्याबद्दल गौरवोद्गार


- नितेश राणे यांच्यासारखे काम राज्यातील कोणत्याही मत्स्यव्यवसाय मंत्र्याला आतापर्यंत करता आले नाही


मुंबई : "मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा दिला गेला पाहिजे ही गेल्या अनेक दिवसांपासूनची संकल्पना होती. तो कृषीचा दर्जा देण्याचे काम आमच्या नितेश राणेंनी (Nitesh Rane) करून दाखवले आहे. खऱ्या अर्थाने कोकणातला आमचा शेर महाराष्ट्रामध्ये प्रचंड ताकद निर्माण करतोय, याचा अभिमान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे", असे गौरवोद्गार महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी सोमवारी काढले.


छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराच्या निमित्ताने कणकवलीत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा दिला जावा अशी मागणी प्रलंबित होती. ती मागणी प्रत्यक्ष पूर्ण करण्याचे काम नितेश राणे (Nitesh Rane) यांनी करून दाखवले आहे. त्यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे आणि आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या क्षेत्राच्या हितासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले. असा निर्णय व काम राज्यातील कोणत्याही मत्स्यविकास मंत्र्याला आतापर्यंत करता आले नव्हते. त्यामुळेच कोकणातील आमचा हा 'शेर' महाराष्ट्रात प्रचंड ताकद निर्माण करत असून त्याचा अभिमान वाटतो.



या वेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रशासकीय सुधारणा आणि जमीन महसुलाच्या महत्त्वाच्या निर्णयांची घोषणा महसूलमंत्र्यांनी (Chandrashekhar Bawankule)व केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हाधिकारी व त्यांच्या पथकाने ५६ हजार लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून दिला आहे. कणकवलीतील शिबिरात मी स्वतः १३५ निवेदने स्वीकारली असून, त्यावर महिन्याभरात ठोस कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.



सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सीमांकन होणार :


- सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दीर्घकालीन विकासासाठी व्यापक सीमांकन आणि जमाबंदी मोहीम राबवण्यात येणार असल्याचे सांगत बावनकुळे म्हणाले की, इंग्रजांच्या काळानंतर या जिल्ह्याचे रीतसर सीमांकन झालेले नाही. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याची कम्प्लिट जमाबंदी केली जाईल. या मोहिमेत सर्व गावठाणे, गावांमधील घरे, शेतरस्ते आणि जमिनींचे पोटहिस्से यांचे सीमांकन केले जाणार आहे.



- तसेच, १ जानेवारी २०११ पूर्वी जिल्ह्यात वास्तव्यास असलेल्या नागरिकांची घरे कायदेशीर करण्याचा मोठा निर्णय राज्य सरकार घेत आहे. तुकडेबंदी कायदा रद्द करण्यात आल्यामुळे रहिवासी क्षेत्रातील घरांना अधिकृत दर्जा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.


- याशिवाय, महिलांना शेतकरी दर्जा देणारे विशेष ओळखपत्र वाटप करण्यासाठी प्रत्येक मतदारसंघात विशेष शिबिरे आयोजित केली जातील, ज्यामुळे महिलांना केंद्र व राज्य सरकारच्या कृषी योजनांचा लाभ घेता येईल, असेही त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

"अखेर मनातलं ओठांवर आलंच, हा सगळा खेळ..."; प्रशांत भूषण यांचा व्हिडीओ शेअर करत मुख्यमंत्री फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल

मुंबई: सीजेपी आणि विरोधी पक्षांकडून दिल्लीत सुरू असलेले आंदोलन म्हणजे सत्तेसाठी सुरू असलेला खेळ आहे, असा

IND vs WI: वेस्ट इंडिजसमोर भारताचा 'अभेद्य किल्ला'! 7 वर्षांचे वर्चस्व राखण्याचे टीम इंडियासमोर आव्हान

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेचा निर्णय शेवटच्या सामन्यावर येऊन ठेपला आहे. 17

Yo Yo Honey Singh : 'यो यो हनी सिंग'च्या अडचणीत मोठी वाढ! आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी महाराष्ट्र सायबर सेलचा मोठा दणका

प्रसिद्ध रॅपर आणि संगीतकार हिरदेश सिंग, ज्यांना जगभर 'यो यो हनी सिंग' (Yo Yo Honey Singh) या नावाने ओळखले जाते, त्यांच्यामागील

Prime Video Chaar Yaar : प्राइम व्हिडिओच्या ‘चार यार’चा ट्रेलर प्रदर्शित; २००० च्या दशकातील मुंबईत उलगडणार गुन्हेगारी आणि मैत्रीची अनोखी कहाणी!

एक्सक्लुझिव्ह ओरिजिनल्ससाठी ओळखली जाणारी भारतातील आघाडीची स्ट्रीमिंग सेवा प्राइम व्हिडिओने आज आपल्या आगामी

Versova Beach Dead Body : वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर गोणीत सापडला मृतदेह; 6 आरोपींना अटक

मुंबई : मुंबईतील वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर 1 ऑक्टोबर रोजी गोणीत एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती.

पुरूष क्रिकेटपटूंनाही जे जमलं नाही, ते स्मृती मंधाना करणार! फक्त 133 धावा करताच रचणार ऐतिहासिक महाविक्रम

[caption id="attachment_1066855" align="aligncenter" width="800"] भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात 16 ऑक्टोबरपासून तीन सामन्यांची टी20 मालिका होणार आहे. या