Private Vehicle Police Sticker : खासगी वाहनांवर 'पोलीस' लिहून चमकोगिरी करणे महागात पडणार

- विशेष तपासणी करून कारवाई होणार; वाहतूक विभागाचे राज्यातील सर्व पोलीस आयुक्तांना पत्र


मुंबई : आपल्या खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर 'पोलीस' असे लिहून किंवा लाल रंगाची पाटी लावून चमकोगिरी करणे आता महागात पडणार आहे. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी विशेष मोहीम राबवून दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) कार्यालयाने राज्यातील सर्व पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षकांना दिले आहेत.


राज्यातील अनेक पोलीस अधिकारी व अंमलदार आपल्या खासगी वाहनांवर 'पोलीस' असे लाल रंगाच्या अक्षरांत लिहून किंवा पाटी लावून फिरताना दिसतात. मात्र, अशा पाट्यांचा वापर करून अवैध कामे केली जात असल्याचे आणि पोलीस पाटीमुळे या गाड्यांची साधी तपासणीही होत नसल्याने त्यांचा वापर भाडेतत्त्वावर अवैध वस्तूंची ने-आण करण्यासाठी केला जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. मुंबई उच्च न्यायालयानेही या गैरप्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत कठोर कारवाईचे आदेश दिले होते.



या पार्श्वभूमीवर, महामार्गांवर तसेच शहरांत अशा प्रकारे 'पोलीस' पाटी किंवा नाव आढळल्यास संबंधित वाहनचालकांवर महाराष्ट्र मोटार वाहन नियम १९८९ च्या कलम १३३ (६) सह मोटार वाहन कायदा १९८८ च्या कलम १७७ अन्वये कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. यामुळे नियमबाह्य पद्धतीने खासगी वाहनांवर शासकीय पदाचा रुबाब दाखवणाऱ्या चालकांवर चाप बसणार आहे.

Comments
Add Comment

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी

मसाल्यांमध्ये कृत्रिम रंग आणि भेसळीला बंदी; उत्पादक, विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिकांनाही नियम बंधनकारक

मुंबई : मसाल्यांमधील भेसळ रोखून ग्राहकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने