Commonwealth Games 2026 : ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा शानदार समारोप; 2030 स्पर्धेची धुरा आता भारताकडे

Commonwealth Games 2026  : ग्लासगो येथे पार पडलेल्या 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा रविवारी रात्री भव्य समारोप सोहळा पार पडला. या सोहळ्यात 2030 मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा राष्ट्रकुल ध्वज आणि मशाल अधिकृतपणे भारताकडे सुपूर्द करण्यात आली. पुढील स्पर्धेचे यजमानपद अहमदाबादकडे असून आता भारताने शताब्दी वर्षातील या स्पर्धेच्या तयारीला सुरुवात केली आहे. (Commonwealth Games 2026)


ध्वज हस्तांतरण सोहळ्यात भारताचे प्रतिनिधित्व ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा (Niraj Chopra), भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षा पी. टी. उषा (PT Usha) आणि गुजरातचे उपमुख्यमंत्री हर्ष संघवी यांनी केले. तर बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक जिंकलेल्या जस्मिन लँबोरिया यांनी 'परेड ऑफ नेशन्स'मध्ये भारताची ध्वजवाहक म्हणून जबाबदारी पार पाडली. (Glasgow 2026)


समारोप सोहळ्यात भारतीय आणि स्कॉटिश संस्कृतीचा सुंदर संगम पाहायला मिळाला. ग्रॅमी पुरस्कार विजेते गायक शंकर महादेवन यांनी आपल्या मुलांसह 'वंदे मातरम', 'ए वतन', 'भाग मिल्खा भाग', 'लहरा दो' आणि 'सबसे आगे होंगे हिंदुस्तानी' यांसारखी लोकप्रिय गीते सादर केली. माजी मिस वर्ल्ड मानुषी चिल्लर हिनेही पारंपरिक भारतीय नृत्य सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. याशिवाय प्रसिद्ध स्कॉटिश बँड 'सिंपल माइंड्स' आणि ऑस्ट्रेलियन गायिका डेल्टा गुडरेम यांच्या सादरीकरणानेही कार्यक्रम रंगतदार झाला.



समारोप सोहळ्यात प्रिन्स एडवर्ड, ड्यूक ऑफ एडिनबर्ग यांनी ग्लासगो 2026 स्पर्धा अधिकृतपणे संपल्याची घोषणा केली. त्यांनी 2030 मध्ये भारतातील अहमदाबाद येथे होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सर्व सदस्य देशांना निमंत्रण दिले. (Soprts News)


यंदाच्या स्पर्धेत भारताने एकूण 39 पदके जिंकत चौथे स्थान मिळवले. भारतीय खेळाडूंनी 13 सुवर्ण, 17 रौप्य आणि 9 कांस्य पदके पटकावली. बॉक्सिंगमध्ये भारताने सर्वाधिक 10 पदके जिंकली. तसेच मीराबाई चानू, अस्मिता डे, हर्ष सिंग, नीरज चोप्रा, गुलवीर सिंग आणि तेजस्विन शंकर यांच्या कामगिरीने भारताची मोहीम संस्मरणीय ठरली.


ग्लासगोतील स्पर्धेचा समारोप झाला असला, तरी आता राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे लक्ष भारताकडे वळले आहे. 2030 मध्ये अहमदाबाद येथे होणाऱ्या स्पर्धेत भारत यजमान म्हणून जगाचे स्वागत करणार आहे.




Comments
Add Comment

Kylian Mbappe : मेस्सीचा विक्रम मोडला! चॅम्पियन्स लीगमध्ये 100 सामने खेळणारा सर्वात तरुण खेळाडू

Kylian Mbappe : फुटबॉल विश्वातून एक अत्यंत रोमांचक आणि अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. रिअल मद्रिदचा स्टार फॉरवर्ड किलियन

IND vs WI: हैदराबाद टी20 पराभवातून टीम इंडियाने घेतला धडा, पुढचा सामना कसा जिंकणार ते श्रेयस अय्यरने सांगितलं

भारतीय संघाला टी20 मालिकेतील वेस्ट इंडिजविरुद्धचा पेपर थोडा कठीण गेला आहे. पहिल्या सामन्यात भारताने विजय मिळवला

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात सामना पराभवाचा वेग काही भलताच, आतापर्यंत सर्व भारतीय कर्णधारांना टाकलं मागे

[caption id="attachment_1066530" align="aligncenter" width="800"] वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या सामन्यात भारताचा पराभव झाला आणि मालिका विजयाचं गणित

IND vs WI: वेस्ट इंडिजने चौथ्या सामन्यात डाव साधला, भारताला नमवून मालिकेत 2-2 ने बरोबरी

वेस्ट इंडिजने चौथ्या टी20 सामन्यात भारताला नमवून मालिका विजयाच्या आशा कायम ठेवल्या आहेत. या मालिकेत चौथ्या

IND vs WI: शाई होपने भारतीय गोलंदाजांना धुतलं, शतक ठोकत टीम इंडियाला बॅकफूटला ढकललं

भारत वेस्ट इंडिज मालिकेतील चौथा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये सुरू आहे. या

मिनी लीलावापूर्वी दिल्ली कॅपिटल्सचा मोठा डाव! दिग्गज खेळाडूला सोडलं आणि वाचवले 10.35 कोटी

इंडियन प्रीमिअर लीग (IPL) सुरू होण्यापूर्वीच संघ बांधणीसाठी जोरदार हालचालींना सुरुवात झाली आहे. आयपीएलमधील ताज्या