Sai Pallavi : सुप्रसिद्ध अभिनेत्रीने २ कोटी रुपयांची जाहिरात नाकारली

दाक्षिणात्य (South Indian ) अभिनेत्री साई पल्लवी 'रामायण' चित्रपटात सीतेची भूमिका साकारत आहे. ट्रेलरमध्ये तिचा लूक समोर आल्यापासून, साईच्या दिसण्याबद्दल बरीच चर्चा सुरू झाली आहे. काहींना ती सीतेच्या भूमिकेत सुंदर वाटली, तर काहींनी तिच्या पोशाखावर आणि कमी मेकअपवर टीका केली.मात्र, साई नेहमीच साधी राहते, मेकअप टाळते. तिला साधेपणा आणि नैसर्गिक रूपात राहायला आवडते. तिने एकदा २ कोटी रुपयांच्या फेअरनेस क्रीमची जाहिरात नाकारली होती.



२०११ मध्ये तिला एका फेअरनेस क्रीमच्या जाहिरातीसाठी ऑफर आली होती आणि मोठी रक्कम सुद्धा देऊ केली होती. साईने २ कोटी रुपयांच्या जाहिरातीला नकार दिला याची २ कारणे होती.


पहिले म्हणजे, साई क्वचितच सौंदर्य प्रसाधने वापरते किंवा मेकअप करते. मेकअप आपल्याला शोभत नाही, असे त्या अभिनेत्रीचे मत आहे. ती कोणतीही लाज न बाळगता आपले मुरुम पडद्यावर दाखवते. साईला नैसर्गिक राहायला आवडते, म्हणूनच चाहते तिला 'नॅचरल ब्युटी' म्हणतात.


साईने एका मुलाखतीत म्हटले होते, "मी सौंदर्य प्रसाधनांची जाहिरात करत नाही. तुम्हाला तुमच्या त्वचेच्या रंगाबद्दल आणि व्यक्तिमत्त्वाबद्दल आत्मविश्वास असायला हवा." मात्र, जाहिरात नाकारण्यामागे तिची बहीण हे प्रमुख कारण होते. २०२० मध्ये 'बॉलिवूड हंगामा'ला दिलेल्या एका मुलाखतीत साईने हा खुलासा केला. तिच्या मते, तिचे असे अनेक मित्र आणि कुटुंबीय आहेत ज्यांना त्यांच्या सावळ्या रंगामुळे कमीपणाची भावना अनुभवावी लागली आहे. समाजाने गोरी त्वचा हे सौंदर्याचे मानक म्हणून स्थापित केले आहे, ज्याला तिचा विरोध आहे.



अभिनेत्री म्हणाली:


"माझा रंग माझ्या बहिणीपेक्षा थोडा जास्त गोरा आहे. कधीकधी, जेव्हा माझी बहीण भाज्या आणि फळे खात नसे, तेव्हा माझी आई तिला सांगायची की या गोष्टी खाल्ल्याने ती गोरी होईल. हे ऐकून मला खूप वाईट वाटायचे. मी माझ्या बहिणीसाठी आवाज उठवायचे ठरवले.


जाहिरातीतून मिळणाऱ्या पैशांचं मी काय करणार?


साईच्या मते, ती नेहमीच साधी राहिली आहे. पैसा हा तिच्यासाठी कधीच प्रेरणास्रोत नव्हता. मात्र, साईने हे स्पष्ट केले की, अशा जाहिराती करणाऱ्या किंवा ब्रँड्सशी संबंधित असणाऱ्या लोकांबद्दल ती कोणताही पूर्वग्रह ठेवत नाही.

Comments
Add Comment

Kashmira Irani Pregnancy : अभिनेत्री कश्मिरा इराणीने दिली गुडन्यूज! ४०व्या वर्षी होणार आई; लग्नानंतर दोन वर्षांनी घरात येणार चिमुकला पाहुणा

मुंबई : बॉलिवूड आणि टेलिव्हिजन विश्वातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. लोकप्रिय अभिनेत्री कश्मिरा इराणी लवकरच

Mirzapur: The Movie : रिलीजपूर्वीच ‘मिर्झापूर: द मूव्ही’ चर्चेत; तब्बल ३ तास १७ मिनिटांचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

मुंबई : प्राइम व्हिडिओची गाजलेली मालिका 'मिर्झापूर' आता 'मिर्झापूर द मूव्ही' या नावाने मोठ्या पडद्यावर प्रदर्शित

Samay Raina : इंडियाज गॉट लेटेंट २' मध्ये नक्की काय घडलं? 'त्या' विनोदावरून समय रैनावर भाजपचे आमदार संतापले

मुंबई : स्टॅन्डअप कॉमेडियन समय रैना पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ‘इंडियाज गॉट लेटंट’च्या नुकत्याच

Imran Hashmi : अभिनेता इम्रान हाश्मीला H1N1ची लागण; प्रकृती बिघडल्याने बंगळुरूचा कार्यक्रमही पुढे ढकलला

मुंबई : अभिनेता इम्रान हाश्मीला स्वाइन फ्लू अर्थात H1N1 विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. शूटिंगच्या

Thug Sukesh Chandrasekhar : सुकेश चंद्रशेखरचे नोरा फतेहीला धमकीवजा पत्र व्हायरल; जॅकलिनबाबत मोठा दावा करत पुरावे सार्वजनिक करण्याची धमकी

२०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील मुख्य आरोपी आणि कारागृहात असलेला ठग सुकेश

Manoj Bajpayee : अभिनेता मनोज बाजपेयीनं महाराष्ट्रात कुठे आणि किती जमीन खरेदी केली ?

मुंबई : मुंबई का किंग कौन भिक्खू म्हात्रे या सत्या चित्रपटातील डायलॉगमुळे १९९८ मध्ये अभिनेता मनोज बाजपेयी