सणासुदीत रेल्वेचा दिलासा ! नाशिक रोड, मनमाड, भुसावळ मार्गे धावणार विशेष रेल्वे; जाणून घ्या वेळापत्रक

Railway Schedule : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मुंबई ते दानापूरदरम्यान एकमार्गी विशेष रेल्वेगाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ही विशेष गाडी ५ ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (Chhatrapati Shivaji Maharaj Terminus) येथून सुटणार असून उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेष गाडीला नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड आणि जळगाव जिल्ह्यातील भुसावळ (Bhusawal) या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा देण्यात आल्याने उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) आणि बिहारकडे (Bihar) जाणाऱ्या उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.



नाशिक रोड, मनमाड, भुसावळ मार्गे विशेष रेल्वे


मध्य रेल्वेने प्रसिद्धी पत्रकात दिलेल्या माहितीनुसार, विशेष गाडी क्रमांक ०१०८१ ही ५ ऑगस्ट २०२६ रोजी पहाटे ००.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (Chhatrapati Shivaji Maharaj Terminus) येथून सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजता दानापूर येथे पोहोचणार आहे. मुंबईहून बिहारकडे जाणाऱ्या प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन ही विशेष सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या विशेष रेल्वेगाडीला दादर, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, प्रयागराज छिवकी, पंडित दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आरा या स्थानकांवर थांबा असेल. त्यामुळे नाशिक, इगतपुरी, मनमाड आणि भुसावळ परिसरातील प्रवाशांना या स्थानकांवरूनच गाडीत प्रवास करता येईल. या विशेष गाडीत १२ शयनयान, ६ सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे तसेच २ सामान्य द्वितीय श्रेणी सह गार्ड्स ब्रेक व्हॅन अशी एकूण रचना ठेवण्यात आली आहे. त्यामुळे आरक्षित आणि अनारक्षित अशा दोन्ही प्रकारच्या प्रवाशांसाठी प्रवासाची सुविधा उपलब्ध राहील.



आरक्षण कधीपासून सुरु होणार ?


या विशेष गाडीचे आरक्षण ३ ऑगस्टपासून सर्व पीआरएस केंद्रांवर तसेच आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर सुरू होणार आहे. अनारक्षित डब्यांसाठी यूटीएस प्रणालीद्वारे तिकीट उपलब्ध होईल. तसेच 'रेल वन' (Rail One) ॲपद्वारेही तिकीट बुक करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. गाडीच्या आगमन आणि प्रस्थानाच्या वेळांची माहिती एनटीईएस ॲप (NTES App) तसेच रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असल्याची माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील निला यांनी दिली आहे.



उत्तर महाराष्ट्रातील दिलासा


मुंबई ते दानापूरदरम्यान धावणाऱ्या विशेष रेल्वेला इगतपुरी, नाशिकरोड, मनमाड व भुसावळ रेल्वे स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. त्यामुळे नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांना या विशेष सेवेचा लाभ होणार असल्याचे मध्य रेल्वेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर

Expired Food Scam : मुदत संपलेल्या 'फूड पॅकेट्स'ची तारीख बदलून विक्री

- 'एफडीए'कडून टोळीचा पर्दाफाश; तुर्भे 'एमआयडीसी'मधून ७५ लाखांचा मुद्देमाल जप्त मुंबई : अन्नपदार्थांच्या

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Maharashtra SIR Voter List : राज्यातील विधानसभा मतदारसंघांच्या प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध

- २ कोटींहून अधिक मतदारांची नावे वगळली; ३० सप्टेंबरपर्यंत दाखल करता येणार हरकती  मुंबई : विशेष सखोल पुनरिक्षण

Elon Musk :‘फक्त शाश्वत ऊर्जा पुरेशी नाही’; पृथ्वीच्या भवितव्याबाबत एलॉन मस्क यांचा मोठा इशारा

टेस्ला आणि स्पेसएक्सचे प्रमुख एलॉन मस्क यांनी पृथ्वीच्या दीर्घकालीन भवितव्याबाबत महत्त्वाचा इशारा दिला आहे.

Jalgaon Crime : संतापजनक ! ‘दुधा’च्या नावाखाली काळा धंदा ! गायीच्या दुधात चक्क 'या' तेलाची भेसळ अन् पुढे...

Jalgaon Crime : गायीच्या दुधात थेट सोयाबीन तेल मिसळून त्याची फॅट वाढवायची आणि हेच भेसळयुक्त दूध ‘म्हशीचे दूध’ म्हणून