Pakistan Suicide Bombing: पाकिस्तानमध्ये शांतता रॅलीवर आत्मघाती बॉम्बहल्ला; 14 जणांचा मृत्यू, अनेक पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश

Pakistan Suicide Bombing : पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा प्रांतात रविवारी झालेल्या आत्मघाती बॉम्बहल्ल्यात किमान 14 जणांचा मृत्यू झाला असून दोन डझनहून अधिक जण जखमी झाले आहेत. (Suicide Bombing In Pakistan) मृतांमध्ये अनेक पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. (Pakistan)


हा हल्ला स्वात खोऱ्यातील कबल शहरात झाला. दहशतवादाविरोधात आणि परिसरात शांतता प्रस्थापित करण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी शांतता रॅलीचे आयोजन केले होते. मोठ्या संख्येने नागरिक आणि पोलीस कर्मचारी या रॅलीत सहभागी झाले होते. रॅलीदरम्यान दहशतवादाविरोधी घोषणा दिल्या जात असताना अचानक आत्मघाती हल्लेखोराने गर्दीत स्वतःला उडवून दिले. (Suicide Blast)



स्फोट इतका भीषण होता की अनेकांचा जागीच मृत्यू झाला, तर अनेक जण गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Terror Attack)



जिल्हा पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटानंतर पोलिस, बचाव पथके आणि रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी पोहोचल्या. जखमींना सुरक्षित ठिकाणी हलवून उपचार सुरू करण्यात आले. परिसर सील करून तपास सुरू करण्यात आला आहे. (Khyber Pathtunkhwa)


या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारलेली नाही. मात्र, सुरक्षा यंत्रणांनी हल्लेखोराची ओळख आणि हल्ल्यामागील सूत्रधारांचा शोध सुरू केला आहे. दहशतवादविरोधी मोहिमेदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या शांतता रॅलीवर झालेल्या या हल्ल्यामुळे पाकिस्तानातील सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.




Comments
Add Comment

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ऐतिहासिक बिश्केक जाहीरनाम्यावर स्वाक्षरी

बिश्केक : २६ व्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) शिखर परिषदेत मंगळवारी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी

USS Abraham Lincoln : थायलंडमध्ये पोलिसांची मोठी कारवाई! ५ हजार अमेरिकन सैनिकांच्या आगमनापूर्वी पटायातील देहव्यापारावर धाडी

पटाया : थायलंडचे प्रसिद्ध पर्यटन शहर असलेल्या पटाया (Pattaya) मध्ये सध्या पोलिसांकडून देहविक्री करणाऱ्या महिला आणि

PM Modi SCO Summit 2026 : दहशतवादावर पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानला थेट संदेश; ‘दहशतवादाबाबत दुहेरी मापदंड नको’

बिश्केक : शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या (SCO) २६व्या शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी

Nepal Flood Rescue : नेपाळ-तिबेट पुरानंतर महाराष्ट्रातील ६७ नागरिकांशी संपर्क नाही; शोधासाठी केंद्राचे विशेष पथक काठमांडूत दाखल

नेपाळ-तिबेट परिसरात २६ ऑगस्ट रोजी आलेल्या विनाशकारी पुरानंतर महाराष्ट्रातील ६७ नागरिकांशी अद्याप संपर्क होऊ

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् इराणचे अध्यक्ष पेझेश्कियान यांची भेट

नवी दिल्ली : अमेरिका आणि इराणमधील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दोन्ही

Crime News : अमेरिकेत केरळच्या महिलांची हत्या

कॅलिफोर्निया : अमेरिकेमधील कॅलिफोर्नियामध्ये भारतातील केरळच्या दोन महिलांची हत्या करण्यात आली आहे. या