Devendra Fadnavis : विरोधकांनी महाराष्ट्राची राजकीय संस्कृती रसातळाला नेली

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावरील 'गुंगी गुडिया' टीकेला प्रत्युत्तर


मुंबई : विरोधकांना जनतेतून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने, प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी ते अत्यंत खालच्या स्तराचे राजकारण करत आहेत. या प्रकारांमुळे विरोधकांनी महाराष्ट्राची उच्च राजकीय संस्कृती रसातळाला नेली आहे, असा हल्लाबोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्याबाबत काँग्रेसकडून करण्यात आलेल्या वादग्रस्त विधानाचा समाचार घेताना त्यांनी विरोधकांवर खरमरीत टीका केली. मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मंत्रालयात माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.



उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्यावर काँग्रेसने सोशल मीडियावरून केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीबाबत विचारले असता मुख्यमंत्री (Devendra Fadnavis) म्हणाले की, विरोधक प्रसिद्धीच्या हव्यासापोटी अतिशय खालच्या स्तरावर उतरले आहेत. "बदनाम हुए तो क्या हुआ, नाम तो हुआ" या मानसिकतेतून हे सर्व चालले असून, महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेत इतकी घसरलेली पातळी यापूर्वी कधीही पाहायला मिळाली नव्हती, अशी उद्विग्नता त्यांनी व्यक्त केली.


'एमपीएससी' पेपरफुटीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार) रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केलेल्या आरोपांविषयी बोलताना मुख्यमंत्र्यांनी (Devendra Fadnavis) स्पष्ट केले की, त्यांनी यापूर्वी केलेल्या आरोपांचे निरसन खुद्द 'एमपीएससी'नेच केलेले आहे. तीन महिन्यांनंतर आरोप झाले असले तरी 'एमपीएससी'ने स्वतः या प्रकरणात पोलिसांत तक्रार दाखल केली असून, सखोल चौकशीची मागणी केली आहे. त्यामुळे या विषयात पारदर्शकता राखली जात असल्याचे त्यांनी सांगितले.



मुंबई पोलीस वेतन घोटाळा 'मविआ'च्या काळातील :


मुंबई पोलिसांमधील बनावट आयडी आणि वेतन घोटाळ्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी (Devendra Fadnavis) हा घोटाळा २०२० मधील असल्याचे स्पष्ट केले. महाविकास आघाडी सरकारच्या काळातील हा घोटाळा असून, त्या प्रकरणाची सध्या सखोल चौकशी सुरू आहे. यात दोषी आढळणाऱ्या प्रत्येकावर कठोर कारवाई केली जात आहे आणि यापुढेही केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण