Nashik : नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना थेट युरोप, चीनमध्ये अभ्यास दौऱ्याची संधी; अर्ज सादर करा अन् थेट अभ्यासासाठी विदेशात जा

Nashik : नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना थेट युरोप आणि चीनमध्ये अभ्यास दौऱ्याची सुवर्णसंधी प्राप्त होणार आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे केवळ उत्पादन आणि उत्पादकता वाढवणे हे ध्येय न राहता उत्पादित होणाऱ्या शेतमालाची दर्जात्मक सुधारणा करण्यासाठी नवीन तंत्रानाचा वापर करणे गरजेचे आहे. शेतीशी निगडीत जगात विकसित होत असलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाची (Modern technology) माहिती शेतकऱ्यांपर्यत पोहचवण्यासाठी तसेच एक आधुनिक प्रयोगशील शेतकरी होण्यासाठी कृषि विभागामार्फत (Agriculture Department) २०२६-२७ वर्षासाठी राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर दौरे ही योजना राबविण्यात येत आहे.


यासाठी पात्र शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह 17 ऑगस्ट 2026 पर्यंत संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात (Taluka Agriculture Officer's Office) अर्ज सादर करावेत, असे आवाहन नाशिक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने (Agriculture Officer Ravindra Mane) यांनी केले आहे.



जिल्ह्यातील शेतकरी थेट विदेशात


या योजनेअंतर्गत २०२६-२७ या वर्षात युरोप (Europe) आणि चीन (China) येथे अभ्यास दौरे आयोजित करण्यात येणार आहेत. चीनमध्ये आधुनिक कृषी तंत्रज्ञान, पीक उत्पादकता वाढविणारी तंत्रे आणि कृषी एक्स्पो तर युरोपमध्ये फलोत्पादन, सेंद्रिय शेती आणि दुग्धोत्पादन याचा अभ्यास करण्यात येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे या दौऱ्यासाठी नाशिक जिल्ह्यातून एकूण पाच लाभार्थींची निवड करण्यात येणार असून त्यामध्ये किमान एक महिला शेतकरी, राज्य अथवा केंद्र शासनस्तरीय कृषी पुरस्कारप्राप्त (Recipient of a government-level agricultural award) किंवा पीक स्पर्धा विजेता (Crop Competition Winner) शेतकरी तसेच इतर पात्र शेतकऱ्यांचा समावेश राहणार आहे.



अटी काय ?


या योजनेसाठी काही ठेवण्यात आल्या आहेत. ज्या पूर्ण असणे आवश्यक आहे. योजनेअंतर्गत शासनाकडून अभ्यास दौऱ्याच्या खर्चाच्या ५० टक्के किंवा कमाल दोन लाख रुपये, यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढे अनुदान देण्यात येणार आहे. योजनेसाठी अर्जदार स्वतः शेतकरी असणे, अ‍ॅग्रीस्टॅक (AgStack) फार्मर आयडी असणे, शेती हेच मुख्य उत्पन्नाचे साधन असणे, निवडीच्या दिवशी किमान २५ वर्षे वय पूर्ण असणे, शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असल्याचे एम.बी.बी.एस. डॉक्टरांचे प्रमाणपत्र सादर करणे तसेच किमान एक वर्ष वैधता असलेला पासपोर्ट असणे आवश्यक आहे. अर्जदार शासकीय, निमशासकीय, सहकारी किंवा खासगी संस्थेतील नोकरदार, डॉक्टर, वकील, सनदी लेखापाल, अभियंता किंवा कंत्राटदार नसावा. यापूर्वी शासन अथवा कृषी विद्यापीठाच्या अर्थसहाय्याने विदेश अभ्यास दौरा केलेला नसावा.

Comments
Add Comment

Nepal Floods : मृतांचा आकडा ९०३ वर तर ४,२४७ बेपत्ता; बचावकार्य युद्धपातळीवर सुरू

काठमांडू : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात आलेल्या विनाशकारी पुरानंतर मदत, शोध आणि बचावकार्य सातत्याने सुरू आहे.

Nashik Kumbhmela : कुंभमेळा संपूर्ण मानवजातीचा, गोदावरी स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकाने काम करावे - निवृत्ती महाराज इंदुरीकर

Nashik : समुद्रमंथनातून प्राप्त अमृताचे थेंब चार ठिकाणी पडले, त्यापैकी चौथा थेंब नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे पडल्याने

Kashmira Irani Pregnancy : अभिनेत्री कश्मिरा इराणीने दिली गुडन्यूज! ४०व्या वर्षी होणार आई; लग्नानंतर दोन वर्षांनी घरात येणार चिमुकला पाहुणा

मुंबई : बॉलिवूड आणि टेलिव्हिजन विश्वातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. लोकप्रिय अभिनेत्री कश्मिरा इराणी लवकरच

Nashik : मिशन ग्रीन मान्सून’चा १० वा टप्पा संपन्न , गंगापूर धरण परिसरात ५ हजार देशी वृक्षांची लागवड

Nashik : नाशिक शहर आणि जिल्ह्याला स्वच्छ, सुंदर, हरित आणि पर्यावरणपूरक बनविण्याच्या व्यापक उद्देशाने पालकमंत्री ना.

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा

Tiwana Football Club : वांद्र्यातील नेव्हिल डि'सूजा फुटबॉल मैदानावर तिवाना संघाची बाजी

- मुंबई फुटबॉल असोसिएशन फर्स्ट डिव्हिजन २०२६ च्या चषकावर कोरले नाव मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई फुटबॉल