Pre Marriage Verification : बायोडेटा खरा की खोटा? कर्ज, शिक्षण अन् लपवलेले अफेअर्स... पालकांनी सुरू केली 'हाय-टेक' तपासणी

लपवलेले प्रेमसंबंध, कर्ज, नोकरी, शिक्षण आणि व्यसनांची पडताळणी; ऑनलाईन मॅट्रिमोनियल फसवणूक टाळण्यासाठी कुटुंबे अधिक सतर्क


पुणे: पुण्यातील लोहगड किल्ल्यावर केतन अगरवाल यांचा कथितपणे त्यांच्या होणाऱ्या पत्नी सिया गोयल हिने ढकलून खून केल्याची घटना समोर आल्यानंतर विवाह ठरवताना कुटुंबांमध्ये सावधगिरी वाढली आहे. आता केवळ नातेवाईकांकडून चौकशी, नोकरी किंवा पत्रिका जुळवण्यावर समाधान न मानता अनेक कुटुंबे थेट खाजगी डिटेक्टिव्ह एजन्सीकडून होणाऱ्या वधू-वराची सविस्तर पार्श्वभूमी तपासून घेत आहेत.



मुंबईतील आघाडीच्या डिटेक्टिव्ह एजन्सींच्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांत 'प्री-मॅरिटल बॅकग्राउंड चेक'साठी येणाऱ्या चौकशीत आणि अर्जांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. या तपासणीमध्ये पूर्वीचे प्रेमसंबंध, सोशल मीडियावरील हालचाली, आर्थिक कर्ज, न्यायालयीन वाद, शैक्षणिक पात्रता, नोकरीची माहिती तसेच मद्यपान, जुगार किंवा इतर व्यसनांची पडताळणी केली जात आहे.


एजन्सींच्या म्हणण्यानुसार, या चौकशीमुळे अनेक विवाह प्रस्ताव अंतिम टप्प्यापूर्वीच रद्द झाले आहेत. एका प्रकरणात तरुणीचे पूर्वीच्या मित्रासोबत साधे संभाषण सुरू असल्याचे समजताच साखरपुडा मोडल्याचे सांगितले जाते. तर दुसऱ्या प्रकरणात वराने मोठे कर्ज आणि सुरू असलेले न्यायालयीन वाद लपवल्याचे उघड झाल्यानंतर विवाह नाकारण्यात आला. आणखी एका प्रकरणात सहकारी महिलेसोबत नियमित प्रवास करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर कोणताही गैरसंबंधाचा पुरावा नसतानाही कुटुंबाने लग्नातून माघार घेतल्याचे समोर आले.


ऑनलाईन मॅट्रिमोनियल वेबसाइट्स आणि डेटिंग अॅप्समुळे अनोळखी व्यक्तींशी संपर्क वाढल्याने फसवणुकीचा धोका लक्षात घेऊन पालक अधिक सतर्क झाले आहेत.


दरम्यान, माजी आयपीएस अधिकारी आणि वकील वाय. पी. सिंग यांनी स्पष्ट केले की, सार्वजनिक नोंदींची कायदेशीर चौकशी किंवा सामान्य माहितीची पडताळणी करणे गुन्हा नाही. मात्र, एखाद्या व्यक्तीचा बेकायदेशीर पाठलाग करणे, कॉल डिटेल्स, खासगी संदेश किंवा ईमेल हॅक करणे हे गंभीर आणि कायद्याने दंडनीय अपराध असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

Comments
Add Comment

Cotton Rate : कापसाच्या दरात तेजीचे संकेत ! भाव 10 हजारांचा टप्पा ओलांडणार? शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या

Cotton Rate : राज्यात यंदा कापूस उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एल निनोचा प्रभाव, पावसातील मोठे

Maharashtra Weather Update: मुंबई-ठाण्यात उष्णतेचा इशारा; कोकणासह देशातील अनेक भागांत पावसाची शक्यता

Maharashtra Weather Update: देशातून नैऋत्य मान्सूनने पूर्णपणे माघार घेतली असली, तरी देशातील हवामानातील बदल सुरूच आहेत. बंगालचा

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि