Abbas Araghchi : परराष्ट्र मंत्री अराघची यांना हटवण्याची तयारी, इराणमध्ये अंतर्गत संघर्ष तीव्र

तेहरान : इराणच्या सत्ताकेंद्रात मोठ्या राजकीय हालचाली सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत. काही खासदारांनी परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याची तयारी सुरू केली असून, त्याचवेळी राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेशकियान यांच्या अधिकारांमध्ये मोठी कपात करण्यात आल्याच्या वृत्तामुळे देशातील सत्तासमीकरणांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.



इराण इंटरनॅशनलच्या अहवालानुसार, ज्येष्ठ खासदार होसैनअली हाजीदेलिगानी यांनी मंगळवारी सांगितले की, “अराघची यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव मांडण्यासाठी आवश्यक पुरावे आणि कागदपत्रे गोळा करण्याचे काम सुरू आहे. योग्य वेळी ही प्रक्रिया औपचारिकपणे सुरू केली जाईल.”



दरम्यान, इस्रायली अहवालात दावा करण्यात आला आहे की, सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचे पुत्र आणि प्रभावशाली नेते मुजतबा खामेनेई यांनी सुरक्षा व परराष्ट्र धोरणाशी संबंधित महत्त्वाच्या निर्णयांमध्ये राष्ट्राध्यक्ष पेजेशकियान यांची भूमिका मर्यादित केली आहे. या बदलांमुळे इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सचा प्रभाव अधिक वाढल्याचे मानले जात आहे. अहवालानुसार, राष्ट्रीय सुरक्षा, अणु कार्यक्रम आणि अमेरिकेसोबतच्या संभाव्य चर्चांसारख्या संवेदनशील विषयांवर आता आयआरजीसी चे वरिष्ठ कमांडर अहमद वाहिदी यांचे मत निर्णायक ठरत आहे. तसेच अमेरिका आणि इराण यांच्यात प्रस्तावित असलेल्या नव्या चर्चेची तारीख आणि ठिकाण अद्याप निश्चित झालेले नाही. पाकिस्तान आणि कतार या देशांची संभाव्य यजमान राष्ट्र म्हणून चर्चा सुरू असून, दोन्ही देश मध्यस्थीची भूमिका बजावण्याचा प्रयत्न करत आहेत. या चर्चेकडे मध्यपूर्वेतील तणाव कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून पाहिले जात आहे.

Comments
Add Comment

WhatsApp : परदेशात गेल्यावर सिम कार्डची कटकट कायमची बंद होणार? व्हॉट्सॲप आणतंय 'हे' धमाकेदार फीचर!

परदेश प्रवास करणार्‍यांसाठी एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. जगभरात मेसेजिंगसाठी सर्वाधिक वापरल्या

Germany Strange Rules: बागेत बाकावर बसून रडणाऱ्या महिलेला दंड! जर्मनीतील अजब नियम चर्चेत

Germany Strange Rules: कधीकधी, आपण एकटे असतो, अस्वस्थ वाटत असते, तेव्हा कोणाशीतरी बोलण्याऐवजी थोडा वेळ एकटे बसावेसे वाटते.

16 डिसेंबरपूर्वी बांगलादेशात महाभूकंप! हसीनांच्या निकटवर्तीयांना अटक; 108 तुकड्या तैनात झाल्याने खळबळ

ढाका : माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या बांगलादेशात परतण्याच्या नियोजित दौऱ्याला काहीच काळ शिल्लक असताना, तारिक

इंडोनेशियात बेकायदा सोन्याच्या खाणीत पाणी शिरलं; 13 कामगारांचा मृत्यू, 13 बेपत्ता

इंडोनेशियाच्या पश्चिम जावा प्रांतात एका अनधिकृत सोन्याच्या खाणीत पाणी शिरल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या

पोलिश तरुणी वंदे भारत पाहून थक्क! चहा-पोह्याचा आस्वाद घेत रचला व्हायरल व्हिडिओ; नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव!

भारतीय रेल्वेच्या आधुनिकतेचा आणि बदलत्या स्वरूपाचा अनुभव आता परदेशी पर्यटकांनाही भुरळ घालत आहे. पोलंडमधील एका

Senator speech holding 6 month baby parliament : ६ महिन्याच्या मुलीला कडेवर घेऊन सिनेटरचे संसदेत भाषण; लिडिया थॉर्पसोबत चिमुकलीचा लपाछपीचा खेळ, भावूक व्हिडिओ व्हायरल

मुंबई : राजकीय सभागृहाचे कामकाज म्हटले की तणावपूर्ण चर्चा, खडाजंगी आणि कडक शिस्त असेच चित्र नेहमी पाहायला मिळते.