Nashik : डेंग्यू, चिकुनगुनिया, मलेरिया, स्वाईन फ्लूविरोधात नाशिक मनपाची विशेष मोहीम

Nashik : नाशिक शहरात डेंग्यू, चिकुनगुनिया, मलेरिया आणि स्वाईन फ्लूच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेच्या (Nashik Municipal Corporation) सार्वजनिक आरोग्य विभागाने प्रतिबंधात्मक मोहीम सुरू केली आहे. प्रथम बाधित रुग्ण आढळलेल्या परिसरात विशेष सर्वेक्षण करून त्यानंतर टप्प्याटप्प्याने शहरभर मोहीम राबविण्यात येणार आहे. (Nashik News)



आरोग्य सेविकांचे पथक घरोघरी जाणार


प्रत्येक आरोग्य वर्धिनी केंद्राच्या (Health and Wellness Centre) कार्यक्षेत्रात मलेरिया फील्ड वर्कर आणि आरोग्य सेविकांचे पथक घराघरात जाऊन पाण्याची भांडी, कुलर, गच्ची, कुंड्या व डासांची उत्पत्ती होणाऱ्या ठिकाणांची तपासणी करणार आहे. डासांची उत्पत्ती आढळल्यास पाणी रिकामे करणे, अबेटिंग व इतर प्रतिबंधात्मक उपाय तातडीने केले जाणार आहेत. ताप, अंगदुखी किंवा इतर लक्षणे असलेल्या संशयित रुग्णांची माहिती घेऊन तपासणी केली जाईल. खासगी रुग्णालयांकडून माहिती मिळाल्यानंतर संबंधित परिसरात ४८ तासांत आरोग्य पथकांकडून कारवाई करण्यात येणार आहे. (Nashik News)



मनपाचे आवाहन


महापालिकेने नागरिकांना घर व परिसरात पाणी साचू न देणे, पाण्याची भांडी नियमित स्वच्छ करणे, कुलर व इतर साठ्यांची काळजी घेणे तसेच तापाची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन केले आहे. (Nashik News)



अशी घ्यावी काळजी


हौद स्वच्छ करून कोरडे करा.


आठवड्यातून एकदा पाण्याची भांडी, टाक्या व कुलर, कुंड्या, फुलदाण्या व इतर ठिकाणी साचलेले पाणी काढा.


पाणी साचणाऱ्या टाकाऊ वस्तूंची विल्हेवाट लावा.


ताप, अंगदुखी किंवा अशक्तपणा जाणवल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्या.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण