Buldhana Samruddhi Expressway Accident : समृद्धी महामार्गावर ट्रकची समोरील वाहनाला धडक; चालकाचा जागीच मृत्यू, क्लिनर जखमी

बुलढाणा : समृद्धी महामार्गावरील अपघातांचे सत्र सुरुच असून मंगळवारी पहाटेच्या सुमारास आणखी एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. चालकाला अचानक झोपेची डुलकी आल्याने भरधाव वेगातील ट्रकने समोरील वाहनाला पाठीमागून जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, ट्रक चालकाचा घटनास्थळीच करुण अंत झाला, तर सुदैवाने त्याचा क्लिनर या अपघातात किरकोळ जखमी झाला आहे.



नेमकी घटना काय घडली ?


मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, राजस्थान पासिंग असलेला 'आरजे-जीडी ४४१२' (RJ-GD 4412) क्रमांकाचा ट्रक समृद्धी महामार्गावरून प्रवास करत होता. पहाटे सुमारे ३.५३ वाजेच्या सुमारास ट्रक समृद्धी महामार्गावरील चॅनेल क्रमांक २६९,४०० जवळ आला असता, चालक लेकराज (वय २६, रा. टेडीबगिया, ता. जि. आग्रा, उत्तर प्रदेश) याला अचानक झोपेची डुलकी आली. पहाटेच्या वेळी गाडीवरील ताबा सुटल्यामुळे भरधाव ट्रक समोरील अज्ञात वाहनावर जाऊन पाठीमागून वेगाने धडकला. ही धडक इतकी भयंकर होती की ट्रकच्या समोरील कॅबिनचा पूर्णपणे चुराडा झाला. या घटनेत गंभीर दुखापत झाल्यामुळे चालक लेकराज याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याच्यासोबत असलेला क्लिनर सोनू निरंजन निषाद (रा. फरे, जि. मथुरा, उत्तर प्रदेश) हा सुदैवाने किरकोळ जखमी झाला.



जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू


अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळाकडे कूच केले. मेहकरजवळील फरदापूर पोलीस चौकीचे पोलीस निरीक्षक सुनील सोळंके, सहायक पोलीस उपनिरीक्षक मंगेश खडसे, तसेच पोलीस कर्मचारी निलेश राठोड, धीरज चंदन, मंगेश तंत्रे आणि गजानन जाधव यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू केले. पोलिसांनी अपघातात जखमी झालेल्या क्लिनर सोनू निषाद याला उपचारासाठी तात्काळ जवळच्या स्थानिक रुग्णालयात दाखल केले. तसेच, अपघातामुळे समृद्धी महामार्गावर झालेली वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अपघातग्रस्त ट्रक बाजूला हटवून रस्त्यावरील वाहतूक पूर्ववत सुरळीत करण्यात आली. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Comments
Add Comment

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी

मसाल्यांमध्ये कृत्रिम रंग आणि भेसळीला बंदी; उत्पादक, विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिकांनाही नियम बंधनकारक

मुंबई : मसाल्यांमधील भेसळ रोखून ग्राहकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने

राज्यातील १०२ आणि १०८ रुग्णवाहिका सेवांचे होणार एकत्रीकरण - वर्ष अखेरीस ४ हजार ५०० नव्या रुग्णवाहिका

मुंबई : राज्यातील आपत्कालीन आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि वेगवान करण्यासाठी १०२ आणि १०८ या रुग्णवाहिका सेवांचे

Pratap Sarnaik : एसटीचा १५ टक्के हंगामी भाडेवाढीचा प्रस्ताव नामंजूर, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना दिलासा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा निर्णय

मुंबई : दुष्काळ आणि महागाईमुळे आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा देण्यासाठी एसटी