ICC ODI World Cup : आयसीसी वन डे वर्ल्ड कपच्या पात्रता फेरीच्या तारखा जाहीर

नवी दिल्ली : पुरुषांच्या आयसीसी वन डे वर्ल्ड कपच्या पात्रता फेरीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. स्पर्धा सुरू होण्यास अद्याप एक वर्षापेक्षा जास्त कालावधी आहे. पण आयसीसीची तयारी सुरू आहे. स्पर्धेच्या पात्रता फेरीतील सामन्यांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. हे सामने फेब्रुवारी आणि मार्च २०२७ दरम्यान खेळवले जातील. आयसीसीने स्पर्धेचे स्वरुप आधीच जाहीर केले आहे. (Men's ICC ODI World Cup 2027)



वन डे वर्ल्ड कपच्या पात्रता फेरीचे सामने २२ फेब्रुवारी ते २३ मार्च २०२७ या कालावधीत खेळवले जातील. यानंतर वर्ल्ड कपमध्ये कोण कोणते संघ खेळणार हे निश्चित होणार आहे. अद्याप मुख्य स्पर्धेच्या तारखा जाहीर झालेल्या नाहीत. पण मुख्य स्पर्धा ४ ऑक्टोबर ते ११ नोव्हेंबर २०२७ दरम्यान होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. स्पर्धेचे आयोजन दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया संयुक्तपणे करणार आहेत. हे सामने एकूण १२ स्टेडियममध्ये खेळवले जातील.



आयसीसीच्या फॉरमॅटनुसार वन डे वर्ल्ड कप २०२७ साठी दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे हे दोन मुख्य यजमान देश मुख्य स्पर्धेत खेळतील. या व्यतिरिक्त भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान, श्रीलंका, अफगाणिस्तान हे देश मुख्य फेरीत खेळतील असे चित्र आहे. नवव्या आणि दहाव्या स्थानासाठी इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि बांगलादेश यांच्यात चुरस आहे. अंतिम निर्णय ३० सप्टेंबर २०२६ च्या क्रमवारी आधारे होणार आहे. पात्रता फेरीअंती त्या फेरीतले प्रत्येक गटातले दोन सर्वोत्तम संघ मुख्य स्पर्धेत खेळतील.

Comments
Add Comment

Lionel Messi : मेस्सीचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा

अर्जेंटिना : अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली

Tiwana Football Club : वांद्र्यातील नेव्हिल डि'सूजा फुटबॉल मैदानावर तिवाना संघाची बाजी

- मुंबई फुटबॉल असोसिएशन फर्स्ट डिव्हिजन २०२६ च्या चषकावर कोरले नाव मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई फुटबॉल

India vs Thailand Women T20 Asia Cup 2026 : भारताचा थायलंडवर ९४ धावांनी दणदणीत विजय; शेफाली वर्माची तुफानी खेळी

दुबई : महिला टी-२० आशिया कप २०२६च्या सलामीच्या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने थायलंडचा ९४ धावांनी पराभव

ENG vs PAK Test Match : लॉर्ड्सवर पाकिस्तानचा ‘काळा दिवस’; १९४ धावांत ऑलआऊट, WTC फायनलच्या शर्यतीतून बाहेर!

लॉर्ड्स : इंग्लंडविरुद्धच्या लॉर्ड्स कसोटीत पाकिस्तानला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. ३८९ धावांच्या

Kagiso Rabada : कागिसो रबाडा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकण्याची शक्यता

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेच्या सुरुवातीपूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे.

Roger Federer : रॉजर फेडररचा 'टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश

नवी दिल्ली : ऱ्होड आयलंडमधील न्यूपोर्ट येथे 'इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश होताना २० वेळा ग्रँडस्लॅम