Pune Nashik Highway Accident : पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; कंटेनरची ट्रकला धडक, ट्रकखाली कार चिरडली

पुणे :  पुणे-नाशिक महामार्गावर खेड तालुक्यात बुधवारी सकाळी सुमारे 6.15 वाजता भीषण अपघात झाला. नाशिकहून पुण्याकडे येणाऱ्या भरधाव कंटेनरने चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुभाजक तोडून विरुद्ध दिशेने जाणाऱ्या ट्रकला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे ट्रक रस्त्याच्या खाली कोसळला, तर त्याच्या खाली एक कारही चिरडली गेली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. (Pune Nashik Highway Accident)


प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, धडक इतकी जोरदार होती की ट्रक रस्त्याबाहेर फेकला गेला आणि त्याच्या शेजारी असलेली कारही त्याखाली दबली. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.



अपघातानंतर पुणे-नाशिक महामार्गावरील दोन्ही दिशेची वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली. विशेषतः पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. महामार्ग पोलिसांनी क्रेनच्या मदतीने कंटेनर आणि ट्रक रस्त्याच्या बाजूला हटवण्याचे काम हाती घेतले असून, वाहतूक पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. (Nashik Road Accident)


दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पावसामुळे पुणे-नाशिक महामार्गाची दुरवस्था चर्चेत आहे. अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही दिवसांपूर्वी याच महामार्गावर दुचाकी अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला होता. आजच्या भीषण अपघातानंतर पुन्हा एकदा या महामार्गाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. (Car Accident)

Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी