Bombay High Court : नितीन गडकरींशी संबंधित बदनामीकारक मजकूर त्वरित हटवा!

मुंबई उच्च न्यायालय; डीपफेक व्हिडिओ आणि आक्षेपार्ह मजकूर हटवण्याचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना निर्देश


मुंबई : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची बदनामी करणारे तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) गैरवापर करून तयार केलेले डीपफेक व्हिडिओ आणि आक्षेपार्ह मजकूर सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून तातडीने हटवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी दिले. केंद्र सरकारच्या इथेनॉल-मिश्रित पेट्रोल (ई-२०) कार्यक्रमाशी गडकरी आणि त्यांच्या कुटुंबाचा खोटा संबंध जोडून त्यांची सामाजिक प्रतिमा मलिन केली जात असल्याच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हे निर्देश दिले.



केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोशल मीडियावरील दिशाभूल करणाऱ्या सामग्रीविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. गूगल, एक्स (ट्विटर), मेटा आणि यूट्यूब यांसारख्या प्रमुख डिजिटल व्यासपीठांवर ई-२० इंधन योजनेवरून गडकरी यांच्या संमतीशिवाय त्यांचे नाव, प्रतिमा, चेहऱ्याची ठेवण आणि आवाजाची नक्कल करून एआय-निर्मित बनावट मजकूर प्रसारित केला जात होता. या आक्षेपार्ह सामग्रीच्या प्रसारावर कायमस्वरूपी बंदी घालण्याची आणि ही सामग्री प्लॅटफॉर्मवरून हटवण्याची मागणी त्यांनी याचिकेद्वारे केली होती.



या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्तींनी प्रसारित करण्यात आलेला मजकूर अत्यंत बदनामीकारक, घृणास्पद आणि द्वेषपूर्ण असल्याचे निरीक्षण नोंदवले. अशा प्रकारच्या दिशाभूल करणाऱ्या सामग्रीला सार्वजनिक व्यासपीठांवर स्थान असू शकत नाही, असे नमूद करत उच्च न्यायालयाने मेटा आणि गूगल एलएलसी या कंपन्यांना गडकरी यांच्या अर्जात नमूद केलेला सर्व बदनामीकारक मजकूर हटवण्याचे स्पष्ट आदेश दिले. याशिवाय, भविष्यातही गडकरी यांच्याविरोधात असा कोणताही डीपफेक किंवा एआय-निर्मित मजकूर आढळल्यास तक्रार प्राप्त होताच संबंधित कंपन्यांनी त्यावर त्वरित कारवाई करावी, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment

तडजोड नको! एअर इंडिया इमारत आणि आमदार निवासाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री शिवेंद्रसिंहराजेंचे आदेश

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक घेत प्रमुख विकासकामांचा थेट

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने

BMC School News : राज्याचे मुख्यमंत्री तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सर न्यायाधीश साकारणार शिक्षकांची भूमिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्मार्ट नागरिक’ हा नागरिकशास्त्र आणि घटनात्मक मूल्यांवरील अभ्यासक्रम तसेच डॉ.