MPSC Group C 2026: उमेदवारांची धाकधूक वाढली! तलाठीचा अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस; साईट डाऊन होण्याआधी करा अर्ज

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 अंतर्गत तलाठी (ग्राम महसूल अधिकारी) आणि इतर विविध संवर्गातील एकूण 5,707 पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत आज (5 ऑगस्ट) रात्री 11:59 वाजेपर्यंत आहे. अद्याप अर्ज न केलेल्या उमेदवारांनी शेवटच्या क्षणाची गर्दी टाळून तातडीने अर्ज सादर करण्याचे आवाहन आयोगाने केले आहे.


या भरती प्रक्रियेत तलाठीची 1,539 पदे, तसेच लिपिक-टंकलेखक आणि इतर विविध संवर्गातील पदांचा समावेश आहे. तलाठी पदासाठी उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे.



गट-क संयुक्त पूर्व परीक्षा 25 ऑक्टोबर 2026 रोजी ऑफलाइन (OMR आधारित) पद्धतीने घेण्यात येणार आहे. अर्ज सादर करण्याची मुदत आज संपत असली, तरी ऑनलाइन परीक्षा शुल्क भरण्यासाठी 8 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 11:59 वाजेपर्यंत वेळ देण्यात आला आहे. आयोगाने यंदा चलनाद्वारे शुल्क भरण्याची सुविधा बंद केली आहे.


जाहिरातीत पद आरक्षित नसणे, पदसंख्या कमी असणे किंवा एखाद्या संवर्गाचा समावेश नसणे या कारणांमुळे अर्ज न केल्यास, त्याबाबतची कोणतीही तक्रार नंतर स्वीकारली जाणार नाही, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.



अर्ज कसा कराल?



  • MPSC च्या अधिकृत संकेतस्थळावर लॉगिन करा.

  • नवीन भरती विभागात जाऊन 'गट-क' जाहिरातीची निवड करा.

  • पात्र असलेल्या पदांसमोरील चेकबॉक्स निवडा.

  • आवश्यक माहिती भरून परीक्षा केंद्राची निवड करा.

  • ऑनलाइन शुल्क भरून अर्ज सबमिट करा.

  • अर्जाची प्रिंटआउट भविष्यासाठी सुरक्षित ठेवावी.


पात्र उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावरूनच अर्ज सादर करून अंतिम मुदत चुकवू नये, असे आयोगाने म्हटले आहे.

Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी