Nikita Rawal Ranbir Kapoor Controversy : रणबीर कपूरच्या अडचणीत वाढ! 'बीफ' वक्तव्यावरून 'रामायण'वर बहिष्काराचे सावट; निकिता रावलची जाहीर माफीची मागणी

मुंबई : दिग्दर्शक नितेश तिवारी (Nitesh Tiwari) आणि निर्माते नमित मल्होत्रा (Namit Malhotra) यांच्या महत्त्वाकांक्षी ‘रामायण’ या दोन भागांच्या सिनेमाची घोषणा झाल्यापासून अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सातत्याने चर्चेत आहे. या चित्रपटात रणबीर भगवान श्रीरामाची भूमिका साकारत आहे. मात्र, या भूमिकेसाठी रणबीरच्या निवडीवर सुरुवातीपासूनच सोशल मीडियावर विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यातच आता रणबीरच्या जुन्या ‘बीफ’ सेवनावरील वक्तव्याचा व्हिडिओ पुन्हा एकदा व्हायरल झाला असून, या वादात अभिनेत्री निकिता रावलने उडी घेतली आहे. रणबीर कपूरने जाहीर माफी मागावी, अन्यथा प्रेक्षकांनी त्याच्यावर आणि त्याच्या चित्रपटावर बहिष्कार टाकावा, असे थेट आवाहन निकिता रावलने केले आहे.



निकिता रावलचे गंभीर आरोप आणि बहिष्काराचे आवाहन


'बॉलीवूड मॅस्कॉट' या माध्यमाशी बोलताना अभिनेत्री निकिता रावलने आपले मत स्पष्टपणे मांडले. ती म्हणाली की, मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम ही केवळ एक पौराणिक कथा किंवा पात्र नसून, देशातील कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धा, मूल्ये आणि आदर्शांचे प्रतीक आहे. त्यामुळे अशा पवित्र भूमिका साकारणाऱ्या कलाकारांचे वैयक्तिक आयुष्य आणि त्यांचे विचार सुसंगत असणे अत्यंत गरजेचे आहे. रणबीर कपूरच्या जुन्या मुलाखतीचा संदर्भ देत, ज्यात त्याने स्वतःला “बीफ प्रेमी” (Big Beef Guy) म्हटले होते. निकिताने #BoycottRanbirKapoor ही मोहीम चालवण्याचा इशारा दिला आहे. ती पुढे म्हणाली, "जर रणबीरला वाटत असेल की त्याच्या वक्तव्यामुळे किंवा वर्तनामुळे लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, तर त्याने पुढे येऊन देशवासीयांची माफी मागितली पाहिजे. भारत हा क्षमाशील देश आहे, इथे प्रामाणिकपणे मागितलेली माफी स्वीकारली जाते. पण जर तो माफी मागणार नसेल, तर लोक त्याला माफ करणार नाहीत. माझ्या मते, रणबीरचे वैयक्तिक चरित्र श्रीरामाच्या पात्राला न्याय देऊ शकत नाही." सिनेसृष्टीचा समाजावर मोठा प्रभाव असतो, त्यामुळे ऐतिहासिक आणि धार्मिक पात्रांशी जोडलेल्या प्रेक्षकांच्या भावनांचा कलाकारांनी आदर केला पाहिजे, असेही तिने ठामपणे सांगितले.



रणबीर कपूरचा ‘बीफ’ विवाद नेमका काय आहे ?


काही वर्षांपूर्वी ‘बर्फी’ या चित्रपटाच्या वेळी दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत रणबीर कपूरने सहजतेने सांगितले होते की, त्याला बीफ खायला खूप आवडते आणि तो स्वतःला ‘बीफ गाई’ मानतो. ही जुनी क्लिप सोशल मीडियावर वेळोवेळी पुन्हा समोर येते आणि युजर्स त्यावरून रणबीरवर जोरदार टीका करतात. ‘रामायण’ चित्रपटात श्रीरामाची भूमिका मिळाल्यापासून हा वाद अधिक तीव्र झाला आहे. मात्र, या संपूर्ण वादावर आणि बहिष्काराच्या मागण्यांवर अभिनेता रणबीर कपूरने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.



कोन आहे अभिनेत्री निकिता रावल ?


निकिता रावल ही एक अभिनेत्री आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. नुकतीच ती शिल्पा शेट्टीच्या ‘माँ है ना’ या रिॲलिटी शोमध्ये सहभागी झाली होती. इन्स्टाग्रामवर तिचे सुमारे १० लाखांहून अधिक (1 Million) फॉलोअर्स आहेत. विविध सामाजिक आणि बॉलिवूडशी संबंधित विषयांवर ती सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत आपले रोखठोक मत मांडण्यासाठी ओळखली जाते.



'रामायण' चित्रपटाबद्दल सविस्तर माहिती


महर्षी वाल्मिकी यांच्या रामायणावर आधारित हा चित्रपट दोन भागांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. भारतीय सिनेसृष्टीतील हा आतापर्यंतचा सर्वात भव्य आणि महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट मानला जात आहे. नितेश तिवारी दिग्दर्शन करत असून नमित मल्होत्रा या चित्रपटाचे निर्माते आहेत. जगप्रसिद्ध संगीतकार हान्स झिमर (Hans Zimmer) आणि ए.आर. रहमान एकत्र येऊन या चित्रपटाला संगीत देत आहेत. 'रामायण - भाग १' ८ नोव्हेंबर २०२६ रोजी जगभरात (IMAX फॉर्मेटमध्ये) प्रदर्शित होईल, तर ‘भाग २’ दिवाळी २०२७ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येईल. या चित्रपटात रणबीर कपूरसोबतच रवी दुबे, साई पल्लवी, यश, सनी देओल, रकुल प्रीत सिंग, अरुण गोविल, काजोल अग्रवाल, विवेक ओबेरॉय, शोभना, कुणाल कपूर, लारा दत्ता, शिबा चड्ढा, आदिनाथ कोठारे आणि अनुपम खेर यांच्यासह अनेक दिग्गज कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.

Comments
Add Comment

KHK 2026: धकधक गर्लचा नवा अंदाज! 'कोण होणार करोडपती'च्या पहिल्याच भागाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि 'धक-धक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित सध्या 'कोण होणार करोडपती'

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

‘पुन्हा नक्की भेटू’ २३ ऑक्टोबरला रंगभूमीवर; नाटकाच्या निमित्ताने मुक्ता आणि मीरा यांची नाट्यक्षेत्रात नवी भरारी

काही नाती काळाच्या ओघात अधिक घट्ट होतात, तर काही नाती नव्या सर्जनशील वाटा खुल्या करतात ज्या नवरात्रीत देवीच्या

Salman Khan : ‘तू असा ड्रेस घालून...’; करिश्मा कपूरच्या ड्रेसवर सलमान खानने घेतला होता आक्षेप, Video Viral

Salman Khan-Karisma Kapoor: बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या जुन्या आठवणींना ‘कॉफी विथ करण’च्या

Chikeezing Movie Teaser: बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारा ‘चिकीझिंग’चा टीझर प्रदर्शित, 19 नोव्हेंबरला चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Chikeezing Movie Teaser : बालपणातील निरागस आठवणी, मोठी स्वप्ने आणि ती पूर्ण करण्याची जिद्द यांचा सुंदर संगम असलेला ‘चिकीझिंग’

Drishyam : ‘दृश्यम 3' चा बॉक्स ऑफिसवर जलवा ! आता 'दृश्यम 4’ येणार ? दिग्दर्शकाने स्पष्टच सांगितलं...

Drishyam 3 : अभिनेता अजय देवगणच्या ‘दृश्यम’ चित्रपट मालिकेने प्रेक्षकांमध्ये मोठी लोकप्रियता मिळवली आहे. रहस्य, थरार