Jalgaon Crime : 'तो' अपघात नव्हताच; रावेरच्या मर्डर मिस्ट्रीचा उलगडा

Jalgaon Crime : जळगावच्या गारखेडा येथील क्राईम मिस्ट्रीचा अखेर उलगडा झाला आहे. २१ वर्षांच्या तरुणानेच आपल्या सख्ख्या काकाचा काटा काढल्याचा खुलासा झाला आहे. खून केल्यानंतर हा केवळ एक अपघाती मृत्यू आहे, असा भास निर्माण करण्यासाठी पुतण्याने मृतदेह नाल्याकाठी नेऊन टाकला होता. पण पोलिसांच्या चाणाक्ष नजरेने आणि फॉरेन्सिक बारकाव्यांनी हा कट अवघ्या काही तासांत उधळून लावला आहे.



नेमकं प्रकरण काय ?


राहता तालुक्यातील गारखेडा येथील रामा थावरू बारेला (वय ४६) आणि त्यांचा सख्खा पुतण्या अनिल (वय २१) जखा बारेला यांच्यात गेल्या काही दिवसांपासून जमिनीच्या तुकड्यावरून वाद सुरु होते. २१ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६:३० वाजेच्या सुमारास दोघांमध्ये पुन्हा एकदा जमिनीवरून शाब्दिक वाद झाले. वाद इतका टोकाला गेला की या वादाचे रूपांतर भयंकर रागात बददले. संतापाच्या भरात अनिलने जवळच पडलेली लाकडी काठी उचलली आणि थेट काका रामा यांच्या डोक्यावर जोरदार वार केला.



हत्येला अपघाताचे रूप देण्याचा कट


वार इतका भीषण होता की, रामा बारेला जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळले आणि त्याचा मृत्यू झाला. काकाचा मृतदेह समोर पडलेला पाहून अनिल घाबरला. पकडले जाण्याच्या भीतीने त्याने या हत्येला अपघाताचे रूप देण्याचा कट रचला. रात्रीचा काळोख वाढण्याची तो वाट पाहू लागला. रात्रीच्या अंधारात त्याने काकाचा मृतदेह सुमारे २० ते २५ मीटर अंतरापर्यंत ओढत नेला आणि पायवाटे जवळील एका नाल्याच्या कडेला फेकून दिला.



लोकांचा आणि पोलिसांचा (Police) हाच समज व्हावा की, रामा है रात्रीच्या अंधारात तोल जाऊन नाल्यात पडले आणि डोक्याला मार लागून त्यांचा अपघाती मृत्यू झाला. हा बनाव रचून अनिल शांतपणे निघून गेला. रात्री ११:०० वाजेच्या सुमारास पाल पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील गारखेडा येथे एका इसमाचा मृतदेह संशयास्पद स्थितीत पडल्याची माहिती रावेर पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच रावेर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले, प्रथमदर्शनी हा अपघात वाटत असला, तरी पोलिसांना काहीतरी मिसिंग असल्याचे जाणवले.



पुतण्या ताब्यात


तपासादरम्यान पोलिसांना मृत रामा बारेला यांच्या डोक्याच्या उजव्या बाजूला गंभीर दुखापत झाल्याचे दिसले. परंतु, केवळ नाल्यात पडल्याने इतकी खोल आणि विशिष्ट प्रकारची दुखापत होणे अशक्य होते. रावेर पोलिसांनी वैज्ञानिक पद्धत आणि तांत्रिक माहितीचा वापर सुरू केला. घटनास्थळाची बारकाईने पाहणी केल्यावर पोलिसांना जमिनीवर मृतदेह ओढत नेल्याचे काही पुरावे आढळले. तसेच स्थानिक चौकशीतून जमिनीच्या वादाची माहिती समोर आली. संशयाची सुई थेट पुतण्या अनिल बारेलाकडे वळली. पोलिसांनी अनिलला ताब्यात घेऊन खाक्या दाखवताच आणि तांत्रिक पुरावे समोर ठेवताच त्याने आपला गुन्हा कबूल केलाय. या घटनेनं पुन्हा एकदा जमिनीचा कौटुंबिक संघर्ष समोर आला आहे.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण