Maharashtra Rain : राज्यात पावसाचा जोर ओसरणार? अल निनोचा प्रभाव वाढणार; घाटमाथ्यावर मात्र मुसळधार पावसाचा इशारा

राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाचा जोर हळूहळू कमी होत असून पुढील दोन महिन्यांत अल निनोचा प्रभाव अधिक तीव्र होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. यामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचे प्रमाण घटण्याची शक्यता असून नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागू शकतो. मात्र, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा परिसरात अद्यापही जोरदार पावसाचा इशारा कायम आहे. (Maharashtra Rain)


भारतीय हवामान विभागाच्या (IMD) ताज्या अंदाजानुसार, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथा भागांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांत मुसळधार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Rain Updates)


याशिवाय, रायगड आणि पुणे जिल्ह्यांच्या घाटमाथा परिसरासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेता स्थानिक प्रशासनाला आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. (Monsoon Update)



पूर्व विदर्भातील गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांसाठीही यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यातील इतर भागांत अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडू शकतात. (Maharashtra Weather)


यंदाच्या मान्सूनवर अल निनोचा प्रभाव राहण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने यापूर्वीच वर्तवला होता. जूनच्या सुरुवातीला पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. मात्र, जूनअखेर आणि जुलैच्या सुरुवातीला झालेल्या दमदार पावसामुळे पेरण्यांना वेग आला आणि राज्यातील अनेक धरणांमधील पाणीसाठ्यातही लक्षणीय वाढ झाली. मराठवाडा आणि विदर्भातील पावसाची तूटही काही प्रमाणात भरून निघाली. (EL Nino Effect)



तथापि, हवामान तज्ज्ञांच्या मते, ५ ऑगस्टनंतर राज्यातील पावसाचा जोर टप्प्याटप्प्याने कमी होण्याची शक्यता आहे. ऑगस्टमध्ये अल निनोचा प्रभाव वाढल्याने पावसाचे प्रमाण घटू शकते. त्यामुळे पुढील काही आठवड्यांत हवामानातील बदलांवर शेतकरी आणि नागरिकांनी लक्ष ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. (Ghats Rains)

Comments
Add Comment

राज्यातील १०२ आणि १०८ रुग्णवाहिका सेवांचे होणार एकत्रीकरण - वर्ष अखेरीस ४ हजार ५०० नव्या रुग्णवाहिका

मुंबई : राज्यातील आपत्कालीन आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि वेगवान करण्यासाठी १०२ आणि १०८ या रुग्णवाहिका सेवांचे

Pratap Sarnaik : एसटीचा १५ टक्के हंगामी भाडेवाढीचा प्रस्ताव नामंजूर, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना दिलासा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा निर्णय

मुंबई : दुष्काळ आणि महागाईमुळे आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा देण्यासाठी एसटी

Maharashtra weather : महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा अंदाज; कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता, मुंबईत उकाडा वाढणार

मुंबई : महाराष्ट्रात एकीकडे उष्णतेचा तडाखा वाढत असताना दुसरीकडे काही भागांत अवकाळी पाऊस आणि गारपिटीचे संकट

विविध शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत सहकार मंत्र्यांची बैठक, ऊस उत्पादकांच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णयासाठी सरकार प्रयत्नशील

मुंबई: राज्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यासाठी राज्य शासन

महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीला नवी झेप; ह्युंदाई मोटर प्रकल्पाचे पुण्यात दिमाखात उद्घाटन, मंत्री उदय सामंत काय म्हणाले?

पुणे :

Jayakumar Rawal : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सोयाबीन, तूर, उडदाला किती मिळणार हमीभाव? 950 खरेदी केंद्रे सज्ज

मुंबई : केंद्र शासनाच्या हमीभाव खरेदी योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2026-27 मध्ये सोयाबीन, मूग, उडीद व तूर खरेदीसाठी