Donald Trump : थोडक्यात बचावले...! ट्रम्प यांच्या 'मरीन वन' हेलिकॉप्टरचा मोठा अपघात टळला; प्रवासी विमान अगदी जवळ आल्याने खळबळ

Donald Trump  : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) प्रवास करत असलेल्या 'मरीन वन' हेलिकॉप्टरशी संबंधित गंभीर घटना समोर आली आहे. उड्डाणादरम्यान ट्रम्प यांच्या हेलिकॉप्टरच्या अगदी जवळून एका प्रवासी विमानाने उड्डाण केल्याने संभाव्य मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. या घटनेनंतर अमेरिकेच्या हवाई वाहतूक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, संबंधित प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

अमेरिकेच्या फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन (FAA)च्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी ट्रम्प यांचे 'मरीन वन' हेलिकॉप्टर व्हाईट हाऊसमधून उड्डाण करत होते. त्याचवेळी रोनाल्ड रीगन वॉशिंग्टन नॅशनल विमानतळावरून एका प्रवासी विमानानेही उड्डाण केले. सुदैवाने दोन्ही विमाने सुरक्षित अंतरावर गेल्याने मोठा अपघात टळला.(Marine One)



या घटनेमुळे सुरक्षा प्रक्रियेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. कारण जानेवारी 2025 मध्ये याच विमानतळाजवळ लष्करी हेलिकॉप्टर आणि प्रवासी विमानाची हवेत धडक होऊन 67 जणांचा मृत्यू झाला होता. त्या दुर्घटनेनंतर FAA ने या परिसरात हेलिकॉप्टर आणि प्रवासी विमानांच्या उड्डाणांबाबत कठोर नियम लागू केले होते. (Washington)


नियमांनुसार, विमानतळ परिसरात दोन विमानांमध्ये किमान 2.4 किलोमीटरचे आडवे अंतर आणि 500 फूट उंचीचा फरक असणे आवश्यक आहे. तसेच राष्ट्राध्यक्षांच्या हेलिकॉप्टरच्या उड्डाणापूर्वी विमानतळावरील इतर उड्डाणे काही काळ थांबवण्याची प्रक्रिया पाळली जाते. मात्र, या वेळी ती प्रक्रिया योग्य प्रकारे राबवली गेली नसल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे.



वृत्तानुसार, ट्रम्प यांचे हेलिकॉप्टर उड्डाण घेतल्यानंतर काही क्षणांतच फ्लोरिडाकडे जाणारे Envoy Air 3742 हे विमान उड्डाण करून त्याच्या मार्गाजवळ आले. त्याचवेळी Republic 4700 हे आणखी एक प्रवासी विमानही परिसरात असल्याने एअर ट्रॅफिक कंट्रोलला त्याचा मार्ग तातडीने बदलावा लागला. (Flight Safety)


या घटनेनंतर एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या कार्यपद्धतीची आणि सुरक्षा नियमांच्या अंमलबजावणीची उच्चस्तरीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी आवश्यक सुधारणा करण्यावरही भर दिला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. (World News)

Comments
Add Comment

WhatsApp : परदेशात गेल्यावर सिम कार्डची कटकट कायमची बंद होणार? व्हॉट्सॲप आणतंय 'हे' धमाकेदार फीचर!

परदेश प्रवास करणार्‍यांसाठी एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. जगभरात मेसेजिंगसाठी सर्वाधिक वापरल्या

Germany Strange Rules: बागेत बाकावर बसून रडणाऱ्या महिलेला दंड! जर्मनीतील अजब नियम चर्चेत

Germany Strange Rules: कधीकधी, आपण एकटे असतो, अस्वस्थ वाटत असते, तेव्हा कोणाशीतरी बोलण्याऐवजी थोडा वेळ एकटे बसावेसे वाटते.

16 डिसेंबरपूर्वी बांगलादेशात महाभूकंप! हसीनांच्या निकटवर्तीयांना अटक; 108 तुकड्या तैनात झाल्याने खळबळ

ढाका : माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या बांगलादेशात परतण्याच्या नियोजित दौऱ्याला काहीच काळ शिल्लक असताना, तारिक

इंडोनेशियात बेकायदा सोन्याच्या खाणीत पाणी शिरलं; 13 कामगारांचा मृत्यू, 13 बेपत्ता

इंडोनेशियाच्या पश्चिम जावा प्रांतात एका अनधिकृत सोन्याच्या खाणीत पाणी शिरल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या

पोलिश तरुणी वंदे भारत पाहून थक्क! चहा-पोह्याचा आस्वाद घेत रचला व्हायरल व्हिडिओ; नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव!

भारतीय रेल्वेच्या आधुनिकतेचा आणि बदलत्या स्वरूपाचा अनुभव आता परदेशी पर्यटकांनाही भुरळ घालत आहे. पोलंडमधील एका

Senator speech holding 6 month baby parliament : ६ महिन्याच्या मुलीला कडेवर घेऊन सिनेटरचे संसदेत भाषण; लिडिया थॉर्पसोबत चिमुकलीचा लपाछपीचा खेळ, भावूक व्हिडिओ व्हायरल

मुंबई : राजकीय सभागृहाचे कामकाज म्हटले की तणावपूर्ण चर्चा, खडाजंगी आणि कडक शिस्त असेच चित्र नेहमी पाहायला मिळते.