Nagpur Crime : लॉजवर घेऊन गेला अन् 30 तास हात पाय बांधून नको ते केलं, नागपूर पोलिसांकडून आरोपीला अटक

नागपूर : नागपुरात (Nagpur) 16 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या अपहरण आणि गंभीर अत्याचाराच्या प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावरून झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत एका 20 वर्षीय तरुणाने मुलीला धमकावत एका लॉजमध्ये डांबून ठेवले आणि तिच्यावर गंभीर अत्याचार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक (Arrest) केली असून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि आरोपीची ओळख इन्स्टाग्रामवरून झाली होती. सुरुवातीला आरोपीने बनावट नाव सांगून तिच्याशी मैत्री केली. कालांतराने त्याने मुलीला धमकावत तिच्याकडून खासगी स्वरूपाचे फोटो मागितल्याचा आरोप आहे. (Crime News)



तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी रविवारी ठाण्यावरून नागपुरात आला आणि तेथील एका लॉजमध्ये खोली घेतली. त्याने मुलीला तिच्या कुटुंबीयांना मारून टाकण्याची धमकी देत भेटण्यासाठी बोलावल्याचा आरोप आहे. भीतीपोटी मुलगी त्याला भेटण्यासाठी गेल्यानंतर तिला जबरदस्तीने लॉजमध्ये नेण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. (Maharashtra News)

30 तास बांधून ठेवलं अन् ...


पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, मुलीला सुमारे 30 तास खोलीत ठेवण्यात आले. या काळात तिच्यावर गंभीर स्वरूपाचा हल्ला करण्यात आला असून धारदार शस्त्राने जखमी केल्याचा आरोप आहे. जखमी अवस्थेत मुलीची सुटका करण्यात आली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Socail Media)

दरम्यान, मुलीचा मोबाईल अचानक बंद झाल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी शोध सुरू केला. वडिलांनी हुडकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवून तातडीने तपास सुरू केला. (Nagpur crime)

तांत्रिक तपास, मोबाईल क्रमांक आणि इतर माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा माग काढला. आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून पुढील चौकशी सुरू आहे. काही माध्यमांच्या वृत्तांनुसार, पोलिस कारवाईदरम्यान आरोपीने मुलीच्या गळ्याला चाकू लावल्याचाही आरोप आहे. मात्र, या दाव्याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. (Police Investigation)

या प्रकरणात पीडित अल्पवयीन असल्यामुळे तिची ओळख आणि इतर वैयक्तिक माहिती कायद्यानुसार गोपनीय ठेवण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणातील सर्व पैलूंचा तपास करत असून संबंधित कायद्यांनुसार पुढील कारवाई केली जात आहे. (Kidnapping)

 
Comments
Add Comment

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी

मसाल्यांमध्ये कृत्रिम रंग आणि भेसळीला बंदी; उत्पादक, विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिकांनाही नियम बंधनकारक

मुंबई : मसाल्यांमधील भेसळ रोखून ग्राहकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने

राज्यातील १०२ आणि १०८ रुग्णवाहिका सेवांचे होणार एकत्रीकरण - वर्ष अखेरीस ४ हजार ५०० नव्या रुग्णवाहिका

मुंबई : राज्यातील आपत्कालीन आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि वेगवान करण्यासाठी १०२ आणि १०८ या रुग्णवाहिका सेवांचे

Pratap Sarnaik : एसटीचा १५ टक्के हंगामी भाडेवाढीचा प्रस्ताव नामंजूर, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना दिलासा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा निर्णय

मुंबई : दुष्काळ आणि महागाईमुळे आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा देण्यासाठी एसटी