Deool Band 2 post goes viral : 'देऊळ बंद 2' चित्रपटगृहातून काढण्याचा मोठा निर्णय; दिग्दर्शक प्रवीण तरडेंची पोस्ट व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीत सामाजिक, धार्मिक आणि वैचारिक विषयांवर भाष्य करणारे चित्रपट नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. असाच एक अत्यंत प्रभावी आणि सुपरहिट ठरणारा चित्रपट म्हणजे 'देऊळ बंद २'. या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले होते. मात्र, आता या चित्रपटाबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. गेली ७५ दिवस बॉक्स ऑफिसवर राज्य करणाऱ्या 'देऊळ बंद २' चित्रपटाला आता प्रेक्षकांना चित्रपटगृहात पाहता येणार नाही, कारण दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी हा चित्रपट सिनेमा हॉलमधून काढून घेण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.



२१ मे २०२६ रोजी हा चित्रपट मोठ्या उत्साहात चित्रपटगृहात रिलीज झाला होता. प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांनी या चित्रपटाला अक्षरशः डोक्यावर घेतले. चित्रपटाची दमदार कथा, विचार करायला लावणारा आशय आणि प्रभावी संवाद यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीत उतरला. या चित्रपटात धार्मिक श्रद्धा, अंधश्रद्धा, सामाजिक प्रश्न, ग्रामीण जीवन आणि मानवी नातेसंबंधांचा अत्यंत सुंदर समतोल साधण्यात आला होता. चित्रपट केवळ मनोरंजकच नव्हे, तर प्रेक्षकांना अंतर्मुख करणारा ठरला.



या चित्रपटात मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज आणि अनुभवी कलाकारांची फौज झळकली होती. यामध्ये मोहन जोशी, महेश मांजरेकर, प्रसाद ओक, प्रवीण तरडे, स्नेहल तरडे, ओम भुतकर आणि मंगेश देसाई यांसारख्या नामवंत कलाकारांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयाने कथेला अधिक प्रभावी बनवले. प्रत्येक पात्राची वास्तववादी मांडणी प्रेक्षकांना भावली.



चित्रपटाला प्रदर्शित होऊन तब्बल ७५ दिवस पूर्ण झाले आहेत. या यशस्वी वाटचालीनंतर प्रवीण तरडे यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत हा चित्रपट चित्रपटगृहातून काढत असल्याची घोषणा केली.



आपल्या पोस्टमध्ये ते म्हणाले, "देऊळ बंद २ ला ७५ दिवस पूर्ण झाले आहेत. आम्ही आता हा सिनेमा सर्व चित्रपटगृहातून काढत आहोत. प्रेक्षकांनी दिलेल्या या अफाट यशाबद्दल आम्ही सदैव तुमच्या ऋणात राहू." या निर्णयामुळे चाहत्यांमध्ये थोडी निराशा झाली असली, तरी चित्रपटाने गाजवलेल्या सुवर्णकाळाची चर्चा सर्वत्र होत आहे.

Comments
Add Comment

Kashmira Irani Pregnancy : अभिनेत्री कश्मिरा इराणीने दिली गुडन्यूज! ४०व्या वर्षी होणार आई; लग्नानंतर दोन वर्षांनी घरात येणार चिमुकला पाहुणा

मुंबई : बॉलिवूड आणि टेलिव्हिजन विश्वातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. लोकप्रिय अभिनेत्री कश्मिरा इराणी लवकरच

Mirzapur: The Movie : रिलीजपूर्वीच ‘मिर्झापूर: द मूव्ही’ चर्चेत; तब्बल ३ तास १७ मिनिटांचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

मुंबई : प्राइम व्हिडिओची गाजलेली मालिका 'मिर्झापूर' आता 'मिर्झापूर द मूव्ही' या नावाने मोठ्या पडद्यावर प्रदर्शित

Samay Raina : इंडियाज गॉट लेटेंट २' मध्ये नक्की काय घडलं? 'त्या' विनोदावरून समय रैनावर भाजपचे आमदार संतापले

मुंबई : स्टॅन्डअप कॉमेडियन समय रैना पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ‘इंडियाज गॉट लेटंट’च्या नुकत्याच

Imran Hashmi : अभिनेता इम्रान हाश्मीला H1N1ची लागण; प्रकृती बिघडल्याने बंगळुरूचा कार्यक्रमही पुढे ढकलला

मुंबई : अभिनेता इम्रान हाश्मीला स्वाइन फ्लू अर्थात H1N1 विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. शूटिंगच्या

Thug Sukesh Chandrasekhar : सुकेश चंद्रशेखरचे नोरा फतेहीला धमकीवजा पत्र व्हायरल; जॅकलिनबाबत मोठा दावा करत पुरावे सार्वजनिक करण्याची धमकी

२०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील मुख्य आरोपी आणि कारागृहात असलेला ठग सुकेश

Manoj Bajpayee : अभिनेता मनोज बाजपेयीनं महाराष्ट्रात कुठे आणि किती जमीन खरेदी केली ?

मुंबई : मुंबई का किंग कौन भिक्खू म्हात्रे या सत्या चित्रपटातील डायलॉगमुळे १९९८ मध्ये अभिनेता मनोज बाजपेयी