Bangladesh : शेख हसीनांच्या कार्यक्रमानंतर शाकिब अल हसनच्या घरावर पेट्रोल बॉम्ब हल्ला; बांगलादेशात तणाव

बांगलादेश क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि माजी खासदार शाकिब अल हसन यांच्या वडिलोपार्जित घरावर पेट्रोल बॉम्बने हल्ला (Petrol Bomb Attack) झाल्याची घटना समोर आली आहे. मगुरा शहरातील केशबमोर परिसरात असलेल्या त्यांच्या घरावर 5 ऑगस्टच्या रात्री सुमारे 8.45 वाजता हा हल्ला झाला. या घटनेत घराची तोडफोड करण्यात आल्याचीही माहिती मिळाली आहे. या प्रकरणामुळे बांगलादेशातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. ( Bangladesh)



मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील फॉरेन करस्पॉन्डंट्स क्लबमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी ऑनलाइन माध्यमातून सहभाग घेतला होता. या कार्यक्रमात शाकिब अल हसनही श्रीलंकेतून ऑनलाइन सहभागी झाला होता. विशेष म्हणजे, शेख हसीना यांनी कार्यक्रमातील आपले भाषण सोशल मीडियावर शेअर केले होते. ( Shakib Al Hasan)


या कार्यक्रमात बोलताना शेख हसीना यांनी पुन्हा बांगलादेशात परतण्याची इच्छा व्यक्त केली. कोणतीही परिस्थिती आली तरी आपण आपल्या देशात परतणार असल्याचे त्यांनी सांगितले. तुरुंगवास किंवा इतर कोणत्याही संकटाला सामोरे जावे लागले तरी देशाच्या विकासासाठी, धर्मनिरपेक्ष मूल्यांसाठी आणि नागरिकांच्या हितासाठी आपण बांगलादेशात परतू, असे त्यांनी स्पष्ट केले. (Bangladesh Politics)


त्यांनी डिसेंबर महिन्यात बांगलादेशात परतण्याची इच्छा व्यक्त करत, हा महिना देशाच्या विजयाचे प्रतीक असल्याचेही नमूद केले. सध्याच्या परिस्थितीचा सामना करण्याची तयारी असल्याचेही त्यांनी सांगितले.


भाषणादरम्यान शेख हसीना यांनी आपल्या वडिलांचे, बांगलादेशचे संस्थापक नेते बंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच 15 ऑगस्ट 1975 रोजी झालेल्या त्यांच्या कुटुंबीयांच्या हत्येची आठवण सांगताना त्या भावूक झाल्या. देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या लाखो नागरिकांनाही त्यांनी अभिवादन केले. (Bangladesh Crisis)


दरम्यान, शाकिब अल हसन यांच्या घरावरील हल्ल्यामागील कारण आणि आरोपींबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. या घटनेचा तपास स्थानिक प्रशासनाकडून सुरू असल्याचे सांगितले जात आहे.


Comments
Add Comment

पाकिस्तानमध्ये शाळेचे छत कोसळून भीषण दुर्घटना, 20 विद्यार्थ्यांसह 21 जणांचा मृत्यू

पेशावर : पाकिस्तानमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पेशावरमधील दिर कॉलनी परिसरात एका खासगी शाळेचे छत

Crime News: अमेरिकेत हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबाराचा कट उधळला; 19 वर्षीय तरुणाला अटक

अमेरिका : अमेरिकेतील शिकागो परिसरात हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबार करण्याचा कथित कट उधळण्यात आला आहे. या

इस्रायलचे नवे कठोर नियम, 31 देशांतील क्रू सदस्यांच्या प्रवेशावर निर्बंध; एअर फ्रान्सकडून पालनाला दुजोरा

तेलअवीव : फ्लाय दुबईच्या विमानाशी संबंधित अपहरणाच्या प्रयत्नानंतर इस्रायलने परदेशी विमान कंपन्यांसाठी

Germany Robot Viral Video : रोबोटकडून १६ वर्षांच्या तरुणीचा लैंगिक छळ; जर्मनीत खळबळ, पोलिसांनी रोबोटसह मोबाईल केले जप्त

कोलोन : जर्मनीतील कोलोन शहरात एका रेस्टॉरंटबाहेर १६ वर्षांच्या अल्पवयीन तरुणीचा रोबोटद्वारे अयोग्य स्पर्श आणि

विमान अपहरणाचा प्रयत्न? UAE मध्ये मालदीवचे 2 वैमानिक अटकेत; नेमकं प्रकरण काय?

अबुधाबी : दुबईहून तेल अवीवच्या दिशेने जाणाऱ्या 'फ्लाय दुबई' (Flydubai) विमानावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी एक मोठी आणि

धक्कादायक! फ्रान्समधील सुपरमार्केटच्या शेकडो फ्रिजवर सायबर हल्ला; अन्नाचा साठा गरम झाल्याने लाखो युरोंचे नुकसान

पॅरिस : फ्रान्समधील सुपरमार्केटवर झालेल्या एका अजब आणि भीषण सायबर हल्ल्यामुळे खळबळ उडाली आहे. या हल्ल्यामुळे