IND vs SLA Test Series Sai Sudharsan : साई सुदर्शन सराव सामन्याला मुकणार, पण...; पहिल्या कसोटीपूर्वी टीम इंडियाला दिलासा

India vs Sri Lanka Test Series : भारताच्या श्रीलंका दौऱ्यापूर्वी युवा फलंदाज साई सुदर्शन (Sai Sudharsan) याच्या दुखापतीमुळे चाहत्यांची चिंता वाढली असली, तरी भारतीय संघासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. पायाच्या अंगठ्याला झालेल्या किरकोळ दुखापतीमुळे तो सराव सामन्याला मुकणार असला, तरी १५ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटीपूर्वी श्रीलंकेत संघात सहभागी होईल, असा विश्वास भारतीय संघ व्यवस्थापनाला आहे. (IND vs SLA Test Series)


साई सुदर्शन (Sai Sudharsan) सध्या बंगळुरू येथील बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली पुनर्वसन करत आहे. दुखापतीत सुधारणा होत असून त्याने पुन्हा फलंदाजीचा सराव सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील सराव सामना ७ ते ९ ऑगस्टदरम्यान कोलंबो येथे खेळवला जाणार आहे. सुरुवातीला हा सामना चार दिवसांचा असणार होता, मात्र आता तो तीन दिवसांचा करण्यात आला आहे. सुदर्शन (Sai Sudharsan) या सामन्यात खेळणार नसला, तरी त्याच्या फिटनेसबाबत सकारात्मक संकेत मिळत आहेत. (IND vs SLA Test Series)



भारतीय संघ आधीच श्रीलंकेत दाखल झाला आहे. मात्र सुदर्शन संघासोबत प्रवास करू शकला नाही. वैद्यकीय पथकाकडून अंतिम फिटनेस प्रमाणपत्र मिळाल्यानंतर तो थेट श्रीलंकेत संघात सहभागी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे गॉल येथे होणाऱ्या पहिल्या कसोटीसाठी त्याची निवड होण्याची शक्यता कायम आहे. (IND vs SLA Test Series)


दरम्यान, सुदर्शन (Sai Sudharsan) वेळेत फिट न झाल्यास देवदत्त पडिक्कल हा पर्याय म्हणून संघ व्यवस्थापनाच्या रडारवर आहे. पडिक्कलने नुकत्याच भारत अ संघाकडून श्रीलंका अ विरुद्धच्या मालिकेत दमदार फलंदाजी करत आपली दावेदारी मजबूत केली आहे. (IND vs SLA Test Series)



भारत-श्रीलंका कसोटी मालिकेतील पहिली कसोटी १५ ऑगस्टपासून गॉल, तर दुसरी कसोटी २३ ऑगस्टपासून कोलंबो येथे खेळवली जाणार आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे आधीच मालिकेबाहेर असल्याने साई सुदर्शनची उपलब्धता भारतीय संघासाठी अधिक महत्त्वाची मानली जात आहे.
सुदर्शनची दुखापत गंभीर नसल्याने भारतीय संघ व्यवस्थापन आशावादी आहे. सराव सामना गमवावा लागला तरी तो पहिल्या कसोटीसाठी पूर्णपणे तंदुरुस्त होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात असून, त्याच्या पुनरागमनाकडे आता क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. (IND vs SLA Test Series)

Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून