Overripe Fruits Recipes : फळं जास्त पिकली? फेकू नका! बनवा भन्नाट आणि स्वादिष्ट पदार्थ; मुलंही मागून-मागून खातील
August 7, 2026 03:13 PM
फळं जास्त पिकली म्हणून ती कचर्यात फेकण्याची घाई करू नका. अतिपिकलेल्या केळी, आंबा, सफरचंद, पपई किंवा चिकू यांचा वापर करून अनेक चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ सहज बनवता येतात. स्मूदी, मिल्कशेक, केक, मफिन्स, जॅम, असे अनेक पर्याय तयार करून अन्नाची नासाडी टाळता येते. थोडीशी कल्पकता वापरली तर वाया जाणारी फळं तुमच्या स्वयंपाकघरातील स्वादिष्ट रेसिपीमध्ये बदलू शकतात आणि पैशांचीही बचत होते.
फ्रूट स्मूदी
जास्त पिकलेलं केळं, आंबा किंवा स्ट्रॉबेरी दूध किंवा दह्यासोबत ब्लेंड करा. 2 मिनिटांत हेल्दी ड्रिंक तयार!
बनाना पॅनकेक
पिकलेल्या केळ्याचा गर, अंडं (किंवा मैदा/ओट्स) घालून मऊ आणि स्वादिष्ट पॅनकेक बनवा.
फ्रूट जॅम
पिकलेले आंबे, स्ट्रॉबेरी किंवा मिक्स फळांपासून साखर घालून घरच्या घरी जॅम तयार करा.
फ्रूट आईस्क्रीम
पिकलेली फळं दही किंवा फ्रेश क्रीममध्ये मिसळा, फ्रीझ करा आणि घरगुती आईस्क्रीमचा आनंद घ्या.
मफिन किंवा केक
पिकलेलं केळं किंवा सफरचंद केकच्या बॅटरमध्ये घालून अधिक मऊ आणि चविष्ट मफिन तयार करा.
मिल्कशेक
पिकलेली फळं, दूध आणि ड्रायफ्रूट्स एकत्र ब्लेंड करून पौष्टिक मिल्कशेक बनवा.
फ्रूट पॉप्सिकल
फळांचा गर साच्यात भरून फ्रीझ करा. मुलांसाठी हेल्दी आणि नैसर्गिक आईसकँडी तयार!
फ्रूट चाट
पिकलेली फळं छोटे तुकडे करून त्यात चाट मसाला, लिंबाचा रस आणि पुदिना घाला. चवदार आणि झटपट स्नॅक तयार.