Nandurbar : नंदुरबार हादरलं ! अल्पवयीन मुलांसह तरुणांचे लैंगिक शोषण, दोनशेपेक्षा अधिक आक्षेपार्ह चित्रफिती

Nandurbar : नंदुरबारमध्ये एक हादरवणारा प्रकार उघडकीस आला आहे. नंदुरबारमध्ये अल्पवयीन बालकांसह काही तरुणांचे लैंगिक शोषण करून त्यांचे अश्लील चित्रफिती आणि छायाचित्रे तयार केल्याचा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी नंदुरबार जिल्ह्यातील एका युवकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता, पोक्सो (POCSO) कायदा तसेच बालकांची काळजी व संरक्षण अधिनियमांतर्गत गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समोर आलेल्या या घटनेनं शहरात खळबळ उडाली आहे. (Nandurbar Crime News)



अल्पवयीन मुलांसह तरुणांचे लैंगिक शोषण


मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, नंदुरबार जिल्ह्यातील रायसिंगपुरा येथील २२ वर्षीय चेतन प्रकाश कोळी (Chetan Prakash Koli) याने २०२२ पासून ते ६ ऑगस्ट २०२६ पर्यंत अल्पवयीन बालकांसह काही तरुणांवर लैंगिक अत्याचार (Sexual abuse of young people) केल्याचा गंभीर आरोप आहे. तसेच या संतापजनक कृत्याच्या चित्रफिती काढून आणि छायाचित्रण करून ते स्वतःच्या मोबाईलमध्ये साठवून ठेवले होते. संबंधित चित्रफिती आणि छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी देत वारंवार लैंगिक शोषण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. (Nandurbar Crime News)



२०० हून अधिक आक्षेपार्ह चित्रफिती


या प्रकरणातील तपासादरम्यान पोलिसांना संशयिताच्या मोबाईलमध्ये २०० हून अधिक आक्षेपार्ह चित्रफिती आढळून आल्याची धक्कादायक माहिती प्राथमिक तपासातून समोर आली आहे. पोलिसांकडून या सर्व चित्रफितींची फॉरेन्सिक तपासणी (Forensic examination) सुरू आहे. या चित्रफितींमधील संभाव्य पीडितांची ओळख पटविण्याचे कामही सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. (Nandurbar Crime News)


दरम्यान, या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३, पोक्सो कायदा आणि बालकांची काळजी व संरक्षण अधिनियमातील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी फॉरेन्सिक पथकाने भेट दिली असून ई-साक्ष आणि व्हिडिओ रेकॉर्डिंगची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल देशमुख करीत असून संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र या संतापजनक घटनेनं संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Comments
Add Comment

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी

मसाल्यांमध्ये कृत्रिम रंग आणि भेसळीला बंदी; उत्पादक, विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिकांनाही नियम बंधनकारक

मुंबई : मसाल्यांमधील भेसळ रोखून ग्राहकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने

राज्यातील १०२ आणि १०८ रुग्णवाहिका सेवांचे होणार एकत्रीकरण - वर्ष अखेरीस ४ हजार ५०० नव्या रुग्णवाहिका

मुंबई : राज्यातील आपत्कालीन आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि वेगवान करण्यासाठी १०२ आणि १०८ या रुग्णवाहिका सेवांचे

Pratap Sarnaik : एसटीचा १५ टक्के हंगामी भाडेवाढीचा प्रस्ताव नामंजूर, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना दिलासा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा निर्णय

मुंबई : दुष्काळ आणि महागाईमुळे आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा देण्यासाठी एसटी